*अकोला पत्रकार हल्लाप्रकरणी लोकस्वातंत्र्यचे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन* *धमक्यांच्या तक्रारीवरच योग्य वेळी कडक कारवाई करण्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अभिवचन

*अकोला पत्रकार हल्लाप्रकरणी लोकस्वातंत्र्यचे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन*
 *धमक्यांच्या तक्रारीवरच योग्य वेळी कडक कारवाई करण्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अभिवचन*
*अकोला* - अकोला येथील दैनिक सुफ्फा वृत्तपत्राचे संपादक हाजी सज्जाद  हुसेन व त्यांच्या मुलांवर कोयते आणि ईतर प्राणघातक शस्त्रांनी हल्ले करण्याची गंभीर घटना  गेल्या शनिवारी घडली.स्थानिक ईराणी वसाहतीमधून अवैध धंदे करणाऱ्या तेथील गुलाम अली औलद हुसेन आणि आकोट फाईलमधील अंबादास उर्फसोनु रोहिदास थोरात या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या तडीपार कारवाईची पोलिस प्रेस नोटनुसारची बातमी प्रकाशित केली म्हणून संतापातून हा हल्ला केला.लोकशाहीचे रक्षण आणि संविधान संवर्धनासाठी आपल्या समाजशील पत्रकारीतेतून योगदान पत्रकारांवर हल्ले होण्याच्या अशा घटना अत्यंत गंभीर आहेत.त्यामुळे  यातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांना निवेदन देऊन २० मिनीटे चर्चा करण्यात आली.लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख(निंबेकर)यांचेसोबत, उपाध्यक्ष प्रदिप खाडे,पुष्पराज गावंडे,सौ.जया भारती,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर ,सागर लोडम,यांचेसह व राष्ट्रीय आणि जिल्हा कार्यकारीणीचे  ४० पत्रकार पदाधिकारी यावेळी उपस्थित होते‌.

      याप्रसंगी पत्रकार संभाव्य हल्ले प्रकरणातील घटनाक्रमांवर व यासंबंधीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.गुन्हेगार प्रवृत्तींकडून अगोदर धमक्या दिल्या जातात ही त्यांची हल्ल्यापूर्वी पत्रकारांना अजमावण्याची सुरूवात असते. त्या तक्रारीवर पोलिस कारवाया होत नाहीत.त्याच संधीचा फायदा घेऊन पत्रकारांवर हल्ले होतात.म्हणून पोलिसांनी वेळीच दक्षता घेण्याची गरज असल्याची अपेक्षा अध्यक्ष संजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.पोलिस आणि पत्रकार हे समाजासाठीच काम करतात.म्हणून त्यांना संरक्षण आणि प्रतिबंधात्मक म्हणून कारवाई म्हणून धमक्यांच्या तक्रारी वेळीच कराव्यात त्याची अगोदरच गंभीर दखल घेतली जाईल असे आश्वासन पोलिस अधिक्षकांनी यावेळी दिले.

        याप्रसंगी पोलिस अधिक्षक कक्षामध्ये संजय एम. देशमुख,व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह  विभागीय संघटक संतोष धरमकर,विजय बाहकर, मनोहर मोहोड,संजय कृ.देशमुख,दिलीप नवले,औरंगजेब हुसेन (सुफ्फा)अर्जून घुगे,बुढन गाडेकर,अनिल मावळे,नरेद्र देशमुख,सौ.दिपाली बाहेकर,संघपाल शिरसाट,दिपक शिरसाट,रमेश समुद्रे,राजेश वानखडे,संतोष मोरे, अॕड.एम.एस.इंगळे, योगेश शिरसाट,एजाज अहमद खान,राजेश वानखडे, प्रकाश जंजाळ,मिलींद शिरसाट,दिपक गवई, मो.जुनेद नूर,फुलचंद वानखडे,रमेश खडसे,गणेश कुरई,चॉंद रिझवी,गुलाम मोहसिन,समीर खान,रमेश खडसे,व अनेक पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.