खामगांव शिवसेना ऊबाठाचे वतीने लाडक्या बहिणीसाठी केले गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन डाक विभागाने ताबडतोब घेतली दखल 🚩.
खामगांव शिवसेना ऊबाठाचे वतीने लाडक्या बहिणीसाठी केले गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन डाक विभागाने ताबडतोब घेतली दखल 🚩.
खामगाव
(संतोष आटोळे)
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे खामगांव चे वतीने खामगांव येथील मुख्य पोस्ट ऑफिस मधील डाक सेवा विस्कळित झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाला राखी पाठविण्यापासून वंचित राहिल्या व सणासुदीचे दिवसात पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी उसळलेलि गर्दी हि बाब खामगांव शिवसेना ऊ बा ठा चे लक्षात येताच गांधीगिरी च्या मार्गाने आंदोलन करून पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर यांना शिवसेनेच्या वतीने आभारपत्र व बुके देऊन शिवसैनिकांनी सत्कार केला व लाडक्या बहिणीला व सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल आभार मानले त्यानंतर लगेच शिवसेना पदाधिकारी याचेधी चर्चा करून दोन अतिरिक्त काऊंटर सुरू करून अनेक लाडक्या बहिणीच्या राख्या पाठविण्याची सहा वाजेपर्यंत व्यवस्था केली यापुढे पैसे काढण्यासाठी गर्दी झाल्यास अतिरिक्त काऊंटर सुरू ठेवून सर्वांना सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही वरिष्ठ अधिकारी यांनी दिली यावेळी शिवसेना तालुका प्रमूख श्रीराम खेलदार संघटक विजय बोदडे खामगांव शहर रवि जैन युवासेना शहर प्रमुख अक्षय हातेकर निर्मला आजी महीला आघाडी हेमंत खारोडे ता उपप्रमुख धीरज फाटे विभाग प्रमुख यशवंत गावंडे शाखा प्रमुख व शिवसैनिक पदाधिकारी हजर होते
Comments
Post a Comment