सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ भट्टड यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा शव पेटी व मेडिकल एड बँक साहित्याचा रमेशचंदजी डिडवाणीया , मधुसूदनजी अग्रवाल चंद्रकांतजी मोहता यांच्या हस्ते लोकार्पण
सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ भट्टड यांच्या वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
शव पेटी व मेडिकल एड बँक साहित्याचा रमेशचंदजी डिडवाणीया , मधुसूदनजी अग्रवाल चंद्रकांतजी मोहता यांच्या हस्ते लोकार्पण
खामगाव :-
(संतोष आटोळे)
सामाजिक कार्यकर्ते व मदतकार्यात सदैव अग्रेसर असणारे नंदुभाऊ रमणलाल भट्टड यांच्या वाढदिवसानिमित्त 13 ऑगस्ट रोजी श्री शिव नवयुवक जगदंबा उत्सव मंडळ च्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व नागरिकांना उपयुक्त असे शव पेटी व मेडिकल एड बँकेचा लोकार्पण सोहळा रमेशचंदजी डिडवाणीया , मधुसूदनजी अग्रवाल चंद्रकांतजी मोहता यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तसेच विविध उपक्रम वाढदिवसानिमित्त घेण्यात आले. यामध्ये खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात बिस्किट व फळ वाटप, शहरात अन्नदान , गाईंना चारा वाटप , मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ व फळ वाटप ,शुगर च्या रुग्णांना 101 ग्लुकोमीटर वितरण करण्यात आले आहे. तसेच शहरातील मेडिकल साहित्यमध्ये कुबडी , पलंग, वाकर , व्हिल चेयर, वॉटर बेड, एअर बेड, कमोड चेअर, नेबुलायझर , शव पेटी, अशा अनेक वस्तू हवे असल्यास त्यांनी रवी जैन यांच्याशी संपर्क साधावा 73016 07301 असे आवाहन सुद्धा यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित दिनेश शेठ अग्रवाल, नितीन शेठ डीडवाणी , मनोज शेठ अग्रवाल, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवी जैन, अक्षय हातेकर, बाबा काळे, महेश देशमुख,बंटी चौकसे गणेश महाले, श्रीराम खेलदार , शेख रजाक, धीरज फाटे यशवंत गवहांदे ,बाळु बानाईत बंडु बोर्डे विक्की जैन, सोनु जैन,यांची उपस्थिती होती
Comments
Post a Comment