श्री जहॉंरवीर गोगा नवमी उत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागतशोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना सानंदा मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरबतचे वितरण
श्री जहॉंरवीर गोगा नवमी उत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत
शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविकांना सानंदा मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरबतचे वितरण
खामगाव = रविवार दि.18 ऑगस्ट 2025 रोजी शहरात दरवष प्रमाणे याहीवष वाल्मीकी मेहतर व सुदर्शन समाज बांधव भगिणींच्या वतीने श्री जहारवीर बाबा गोगा देवजी नवमी उत्सव भक्तीभावपुर्ण व हर्ष्ाोल्हास वातावरणा उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त सतीफैल भागातुन मानाची छडी व शंकर नगर भागातुन मंडळाकडुन शहरातुन शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे एकबोटे चौक येथे आगमन झाले असता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी शोभायात्रेचे स्वागत करुन गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे दर्शन घेतले व वाल्मीकी मेहतर समाज व सुदर्शन समाज बांध्ावांना गोगानवमीच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राजुभाऊ सारवान,कैलास धेडुंदे,ईश्वर सारसर,प्रकाश सारसर,हेमराज सारसर,विजय सारवान, राज सारसर, जगदिश निंदाने यांच्यासह वाल्मीक समाज बांध्ाव उपस्थित होते.
गोगानवमी निमित्त समाज बांध्ावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा महिना वाल्मीकी मेहतर समाज बांध्ावांसाठी अत्यंत पवित्र महिना असतो. संपुर्ण महिना भर उपवास करुन ईश्वराची आराध्ाना केली जाती. श्री गोगाजी महाराज जयंतीच्या पावन पर्वावर दरवष शंकर नगर,बाळापुर फैल,सतीफैल या भागातुन वाल्मीकी समाज बांध्ावांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येतात.या शोभायात्रेमध्ये वाल्मीकी समाजाचे प्रतिष्ठीत नागरिक,महिला भगिणी हजारोंच्या संख्येने सहभागी होत असतात. परंतू यावर्षी सतीफैल आणि बाळापुर फैल भागामध्ये वाल्मीकी समाजामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे यावष दोनच मंडळांनी शोभायात्रा काढल्या.या दोन्ही मंडळाच्या शोभायात्रा खामगांव शहरातील विविध्ा मार्गाने मार्गक्रमण करीत एकबोटे चौक येथे आली असता सानंदा मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या शेकडो भाविकांना शरबतचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, पोशाख ड्रेसेसचे संचालक संजुभाऊ शर्मा, विजय काटोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे,शिवाजीराव पांढरे,लाखनवाडा ग्राम पंचायतचे सरपंच विलास पांढरे, माजी सरपंच विजय खंडारे, माजी सरपंच विजय रायगावकर ,डॉ.आकाश इंगळे, डॉ.आर.के.राजपुत, काळेगावचे माजी सरपंच विलाससिंग इंगळे, गोंधनापुर ग्राम पंचायतचे सरपंच राजेंद्र खंडारे, ग्राम पंचायत सदस्य नदीमभाई, जयराम मुंडाले,केशव खंडारे,पुरुषोत्तम शेजोळे, निवृत्ती धामनकार, वासुदेव चौभारे, मोहन हसंबे, गोपाल चौभारे,रोहित राजपुत,वैभव वानखडे,श्याम मोरे,संदिप शमी, सुनिल मानकर, अक्षय मिरगे, सुरेंद्र पवार, संतोष आटोळे,प्रशांत शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment