बैलपोळा साजरा न करण्याचे आवाहन!आदेश जारी
बैलपोळा साजरा न करण्याचे आवाहन!
आदेश जारी
बुलढाणा
प्रतिनिधी
ज्या अर्थी बुलढाणा जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये लंपीचर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निपन्न झालेले आहे. त्याअनुषंगाने संदर्भ 2. व 3 अन्वये प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम-2009 नुसार अधिसुचना जारी करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचनेनुसार या रोगाचा प्रसार वाढु नये या करीता प्रतिबंधात्मक खबरदारी घेवुन कार्यवाही करण्याचे आदेश सर्व संबधीत सर्व विभागांना देण्यात आलेले आहे.
दि.22.08.2025 रोजी बैलपोळा असुन हा सण साजरा करतांना बैल एकत्रित जमा करुन साजरा केल्यास तसेच शर्यतीचे आयोजन केल्यास लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा सण साध्या व घरगुती रितीने साजरा करणे आवश्यक आहे. त्यामुळे बैलपोळा या सणाकरीता सर्व पशुपालकांकडुन साध्या पध्दतीने साजरा होईल या पध्दतीने सर्व संबंधीत विभागांची दक्षता घ्यावी. तसेच हा अनुसूचित रोग असल्याने प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यामध्ये व्यक्ती, संबंधित पशुपालक शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिरंगाई केल्यास अथवा कार्यवाहीत अडथळा आणल्यास विरुध्द प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम-2009 मधील कलम 31,32 व 33 येथील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
असे
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) बुलढाणा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हाआपत्ती व्यवस्थापन यांनी उचित कार्यवाही साठी आदेशित केले आहे
Comments
Post a Comment