राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
खामगाव
संतोष आटोळे
: राष्ट्रीय ओबीसी महासंघ बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व ओबीसी योजनांचे मार्गदर्शन येत्या रविवारी श्रीहरी लॉन्स नांदुरा रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर राहणार आहेत. यावेळी मुख्य अतिथी म्हणून आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा,राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, राज्य अध्यक्ष प्रकाश भांगरथ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग बुलढाणा संचालक मनोज मेरत, काँग्रेस पक्ष नेता स्वातीताई वाकेकर महिला अध्यक्ष ज्योतीताई ढोकणे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी प्रतिभाताई भोपळे तसेच विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय समन्वयक रामकृष्ण जावकार, धनगर समाज राज्य उपाध्यक्ष शरद वसतकार, राजूभाऊ झापर्डे, शिवशंकर लोखंडकार, धोंडीराम खंडारे, दत्ताभाऊ खरात, वृषभ राऊत, अनंतराव भारसाकडे,विजय डवंगे, जि.प.बुलढाणा उपकार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकडे, अनिल मुलांडे, राजेश अंबुसकर यांची उपस्थिती राहणार आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत सत्कार सोहळा व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे व युवा जिल्हाध्यक्ष सुरज बेलोकार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment