जागतिक छायाचित्रकार दिनाचा कार्यक्रम मंगळवारी फोटोग्राफर्स यांनी उपस्थित राहावे
जागतिक छायाचित्रकार दिनाचा कार्यक्रम मंगळवारी
फोटोग्राफर्स यांनी उपस्थित राहावे
खामगाव:-
संतोष आटोळे
खामगाव फोटोग्राफर्स क्लबचा मंगळवारी १९ ऑगस्ट २५ रोजी प्रथम वर्धापन दिन व जागतिक छायाचित्रण दिनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
घाटपुरी मंगल कार्यालय येथे जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून कॅमेरा पूजन, खामगांव फोटोग्राफर क्लब चा प्रथम वर्धापन दिन साजरा करून, तसेच क्लब मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळेच्या विषयी माहिती आणि सोबतच ए आय तंत्रज्ञान आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी यावर चर्चासत्र परिवार मेळावा, सहपरिवार स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे .तरी जास्तीत जास्त फोटोग्राफर बंधूनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव फोटोग्राफर्स क्लब तर्फे करण्यात आले आहे
Comments
Post a Comment