सा. ग्रामक्रांती पुरस्काराने पहुरजीरा येथील जि. प.कें.उच्च प्राथमिक मुलांची शाळा सन्मानितगावाचा सर्वांगीण विकास म्हणजेच गामक्रांती .. ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरेशोध पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार निवड ... ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल
सा. ग्रामक्रांती पुरस्काराने पहुरजीरा येथील जि. प.कें.उच्च प्राथमिक मुलांची शाळा सन्मानित
गावाचा सर्वांगीण विकास म्हणजेच गामक्रांती .. ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे
शोध पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार निवड ... ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल
शेगाव
(सागर शिरसाट )
शेगाव तालुक्यातील पहुरजिरा गावातील इ. सन 1873 ची स्थापना असलेली जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मुलांची शाळा जी आजही अतिशय चांगली कार्यरत असून या शाळेला दीडशे वर्ष होऊन गेली आहे स्वातंत्र्यपूर्व शैक्षणिक क्रांती मध्ये सदर शाळेचे अमूल्य योगदान आहे. त्याकाळी स्वदेशी जागरण, हातमाग, कृषी व सामाजिक, सांस्कृतिक तसेच राष्ट्रसेवाभाव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे बहुमूल्य कार्य या शाळेने केले आहे.
त्या कार्याची दखल घेऊन '9 ऑगस्ट क्रांती दिन सा. ग्राम क्रांती वृत्तपत्र वर्धापन दिनानिमित्त 13 ऑगस्ट रोजी सा.ग्रामक्रांती हा पुरस्कार दै.देशोन्नती आवृत्ती संपादक मा. श्री. राजेशजी राजोरे व ज्येष्ठ संपादक या .श्री. जगदीशजी अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करुन या शाळेला सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीच्या अध्यक्ष सौ. गीताबाई तुळशीराम पारस्कर तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक देशोन्नती जिल्हा आवृत्ती संपादक राजेशजी राजोरे ज्येष्ठ पत्रकार जगदीशजी अग्रवाल राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितेश मानकर सा. ग्रामक्रांती
संपादक. श्री मंगेश तोमर कार्यकारी संपादक. संभाजीराव टाले गावाच्या सरपंच सौ.शारदाताई मंगेश पारस्कर. मा.पं.स. सदस्य ब्रह्मानंद पारस्कर ग्राम विस्तार अधिकारी देशमुख साहेब केंद्रप्रमुख झनके शाळेच्या मुख्याध्यापिका बोपले मॅडम कन्या शाळेच्या मुख्याध्यापक अंभोरे मॅडम सातपुडा हायस्कूलचे मुख्याध्यापक वानखडे सर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मुस्ताक सर शाळा समिती माजी अध्यक्ष निलेश पारस्कर ग्रामपंचायत सदस्य शिवा पारस्कर व तायडे सर हे होते तर श्री राजेशजी राजोरे यांनीआपले मनोगत व्यक्त करताना व मार्गदर्शन करताना सांगितले की भारत हा देश ग्रामीण भागात वसलेला असून ग्रामीण भागातील क्रांती म्हणजेच ग्राम क्रांती होय गावात चांगली शिक्षण. व्यवस्था स्वच्छता वआरोग्य व्यवस्था. गावात शेतीवर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या उद्योग धंद्यांना चालना शेतीमालाला आयात निर्यात करण्यासाठी चांगले रस्ते असले पाहिजे व गावाचा सर्वांगीण विकास म्हणजेच ग्रामक्रांती तर ग्राम क्रांती पुरस्कार हा या शाळेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगितले तर ज्येष्ठ संपादक जगदीश अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शोध पत्रकारिताच्या माध्यमातून सा. ग्रामक्रांतीचे संपादक मंगेश तोमर व कार्यकारी संपादक संभाजीराव टाले यांनी पुरस्कारासाठी योग्य शाळेची निवड केली आहे असं सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजीराव टाले यांनी तर सूत्रसंचालन व आभार अनंता पारस्कर सर यांनी केले वेळी समस्त शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी पालक व गावकऱ्यांची उपस्थिती होती
Comments
Post a Comment