खामगांव येथील श्री. अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणसौरभ कार्यक्रम संपन्न
खामगांव येथील श्री. अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणसौरभ कार्यक्रम संपन्न
खामगांव (संतोष आटोळे)
आज दि. ०६ ऑगष्ट २०२५ रोजी श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये एस.एस.सी., एच.एस.सी (२०२५) मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी, शिष्यवृत्ती, एम.टी.एस., एन.टी.एस., एन.एम.एम.एस., स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा २०२४, विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, एलीमेंट्री ग्रेड परीक्षा, ए-श्रेणी उत्तीर्ण, एम.टी.एस. परीक्षा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, एन.सी.सी. विभाग, क्रीडा विभागातून राज्यस्तरावर खेळलेल्या अशा विविध क्षेत्रामध्ये नेत्रदिपक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिस व पारोतोषिक देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. दिनेशजी संघवी यांनी भुषवीले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून मा.डॉ.श्री. रामेश्वर पुरी (उपविभागीय अधिकारी महसूल), खामगांव व मा.डॉ.श्री. प्रशांत चौधरी (मज्जा मनोविकार तज्ञ, मुंबई), संस्थेचे सचिव श्री. मनोजजी नागडा, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विजयजी नागडा, शाळेच्या प्राचार्या सौ. नंदा उदापूरकर, डॉ.सौ. हेमा जवंजाळ (प्राचार्या- सु.रा. मोहता महिला महाविद्यालय) या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा विविध पारीतोषिक देवून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ. नंदा उदापूरकर मॅडम यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. गणेश भरगडे सर, श्री जतिन लोडाया सर यांनी दिला. आपल्या मनोगत व्यक्त करतांना मनोविकार तज्ञ डॉ. प्रशांत चौधरी यांनी माजी विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातील अनुभवांना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे दुसरे अतिथी डॉ. श्री. रामेश्वर पुरी यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती मनिषा भाटे, सौ. पुजा नारायणन, सौ. रुपाली टापरे, श्री अंकित शाह यांनी केले. अध्यक्षीय भाषण श्री दिनेशजी संघवी यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, खामगांव शहरातील प्रतिष्ठित नागरीक, विद्यार्थी व पालक वर्ग, माजी विद्यार्थी, संपादक श्री राजेश राजोरे साहेब, विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, माजी मुख्याध्यापक श्री. हुरसाड सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. क्षिरसागर सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशस्वीरीत्या पार पडला व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment