*छत्रपती शिवाजी महाराज* *महाराजस्व समाधान शिबिर* *उत्साहात संपन्न* *उपविभागीय अधिकारी डॉ.* *रामेश्वर पुरी यांचा विशेष* *सन्मान
*छत्रपती शिवाजी महाराज* *महाराजस्व समाधान शिबिर* *उत्साहात संपन्न*
*उपविभागीय अधिकारी डॉ.* *रामेश्वर पुरी यांचा विशेष* *सन्मान*
*खामगाव:- ०५* (उमाका) छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित महसूल सप्ताह अंतर्गत दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी खामगाव तालुक्यातील वर्णा गावात महाराणा प्रताप सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसेच ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्णा गावच्या सरपंच स्वाती उमेश इंगळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी व नायब तहसिलदार निखिल पाटील उपस्थित होते.
सदर शिबिरात महसूल विभागामार्फत सातबारा, आठ अ फेरफाराचे एकूण ३८ दाखले वितरित करण्यात आले. तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे एकूण २२ आदेश लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. संजय गांधी योजनेंतर्गत ७ नवीन अर्ज स्वीकारण्यात आले. आधार कार्ड अद्ययावतीकरण व ई-केवायसी सेवा अंतर्गत ३१ लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात आली. जिवंत ७/१२ प्रमाणपत्रासाठी ८ अर्ज स्वीकृत करण्यात आले, तर उत्पन्न प्रमाणपत्र व इतर दाखले यासाठी १६ लाभार्थ्यांना सेवा दिली गेली.
कृषी विभागामार्फत काळेगाव येथील दोन शेतकऱ्यांना कांदा चाळ मंजुरी आदेश देण्यात आले, सहा शेतकऱ्यांना फळबाग लागवड मंजुरी पत्र तर वर्णा येथील चार शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना मंजूर करण्यात आली. हुमणी अळी नियंत्रणाबाबत ग्राम कृषी अधिकारी सौ. जाधव यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ग्राम महसूल अधिकारी अनिल शिंदे काळेगाव यांनी यशस्वीरित्या पार पाडली, तर प्रास्ताविक ग्राम महसूल अधिकारी कुमारी स्वाती वाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांना महसुली वर्ष २०२४-२५ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा मार्फत देण्यात आलेल्या ‘उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला. तसेच ‘राजीव गांधी गतिमानता पुरस्कार’ प्राप्त नायब तहसिलदार निखिल पाटील यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये मंडळ अधिकारी रामदास चौधरी, पोलीस पाटील सुरेंद्र प्रतापसिंग इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू इंगळे, तालुका अध्यक्ष महादेव अवचार, माजी उपसभापती भगवानसिंग सोलंके, कृषी तंत्र अधिकारी विजय कंदील यांच्यासह महसूल व कृषी विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम महसूल अधिकारी पी. बी. वंजारी ढोरपगाव, ज्ञानेश्वर नागरे भालेगाव, अनिल शिंदे काळेगाव, कुमारी स्नेहा वाडेकर हिवरा बुद्रुक, कुमारी पल्लवी खंडारे नांद्री, व ग्राम महसूल अधिकारी टेकाळे मॅडम वर्णा यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
महसूल विभागाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा उद्देश या शिबिराच्या माध्यमातून साध्य झाला.
Comments
Post a Comment