*महाराष्ट्र समाजभूषण , समाजरत्न , चौथा आधारस्तंभ पत्रकार , आदर्श शिक्षकरत्न , क्रीडारत्न पुरस्कार प्रदान*


*महाराष्ट्र समाजभूषण , समाजरत्न , चौथा आधारस्तंभ पत्रकार , आदर्श शिक्षकरत्न , क्रीडारत्न पुरस्कार प्रदान*
*महाराष्ट्रात प्रथमच भव्य दिव्य व आगळावेगळा कार्यक्रम*

नव स्वराज्य न्युज व युवा ग्रामीण पत्रकार संघ प्रथम वर्धापन दिनानिमित्त तब्बल 70 जणांचा गुणगौरव साजरा

राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ,  पत्रकारांचा सत्कार , गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव , वकृत्व स्पर्धेचा निकालात तीन मुलींची बाजी 
( देवळी )

वर्धा : नव स्वराज्य न्युज व युवा ग्रामीण पत्रकार संघ द्वारा प्रथम वर्धापन दिन भव्य दिव्य उत्साहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण पार पडला हा सोहळा देवळी शहरातील नगर परिषद लागून असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक राजेश बकाने आमदार देवळी पुलगाव विधानसभा, कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ , प्रमुख अतिथी मोहनबाबूजी अग्रवाल  ज्येष्ठ समाजसेवक , नितेश कराळे प्रवक्ता , गोविंद पोलाड विद्रोही कवी ,  व्याख्याता , उमेश म्हैसकर अभिनेता ,विजयकुमार खंडारे अभिनेता , श्रीपा तेलंगे अभिनेत्री , संतोष भोयर , आर्यन कांबळे , रोहिणी बाबर तसेच देवळी शहरातील सर्व शिक्षकवृंद  , पत्रकार यांच्या उपस्थितीत दोन महिन्यापासून अनेकांनी जवळपास 150 प्रस्ताव सादर करण्यात आले  होते त्यातून निवड झालेले प्रथम वर्धापन दिन राज्यस्तरीय 2025 महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार  जयश्री चव्हाण , डॉ. आशिष लांडे असे 2 , समाज रत्न  पुरस्कार  प्रज्वल लटारे , सुनैना डोंगरे , संग्राम आंदे , असे 4 , महाराष्ट्र चौथा आधारस्तंभ पत्रकार पुरस्कार चंद्रकांत लोणारे , सुयोग ठाकरे , सुनीता महाडिक असे 3 , महाराष्ट्र आदर्श शिक्षक पुरस्कार 2 , महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार सुहास बनकर, भूषण देशमुख
  2 , उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 15 , सन्मान चिन्ह 15 , गुणवंत विद्यार्थी 20 , वकृत्व स्पर्धक प्रथम कोमल शितले वर्ग 12 , द्वितीय  विठू कुमारी चौधरी , वर्ग 10 , तृतीय कल्याणी डंभारे वर्ग सात , आंतरराष्ट्रीय खेळाडू 7 , MBBS साठी निवड झालेला फटिंग व ईतर राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरव व सन्मान  व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वकृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. उर्वरित मुलांना राज्यस्तरीय सन्मानपत्र देऊन गौरव झाला व बिहाली चित्रपटाचे विमोचन करीत मान्यवरांनी व्यासपीठावर विचार व्यक्त केले आणि सदर कार्यक्रमाचे आयोजन सचिन वैद्य व  नव स्वराज्य न्युज व युवा ग्रामीण पत्रकार संघ वर्धा पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्याचप्रमाणे मान्यवरांनी व इतर सजक महिला, नागरिकांनी सचिन वैद्य चे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या असून कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा पोरकर तर आभार रोहिणी बाबर यांनी मांडले. आणि  त्याचप्रमाणे देवळी तालुक्यातील पत्रकार , शिक्षक , नागरिक  , महिला , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन या  कार्यक्रमाचा लाभ घेत सर्वत्र आनंदाचे वातावरन निर्माण झाले होते.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.