काँग्रेस शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
काँग्रेस शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
खामगाव ः खामगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२० ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील यांचा २० ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त बुधवारी सकाळी ७ वाजता त्यांच्या सुधृढ निरोगी उदंड आयुष्याच्या प्रार्थने करीता शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुटाळा येथील पंचक्रोशितील प्रसिध्द श्री महादेव मंदिर येथे शिवपिंडीला जलाभिषेक करण्यात येणार आहे. त्यांनतर सकाळी ९.३० वाजता ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर, १०.३० वाजता सावजी लेआऊट परिसरात वृक्षारोपण, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता सामान्य रूग्णालयात गरजुंना अन्नदान करण्यात येईल. तसेच दुपारी शहरातील नगर परिषद शाळा व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराने उपस्थित रहावे असे आवाहन खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वप्निल दादा ठाकरे यांना वाढदिवसाच्या दिव्यांग शक्ती परिवार व विराट मल्टीपर्पस फाउंडेशन च्या वतीने शुभेच्छा
Comments
Post a Comment