*महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन* मा.आ.विजयराज शिंदे व भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांची उपस्थिती
*महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन*
*खामगाव, दि. १० (उमाका):* राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी संत नगरी शेगाव येथे भेट देऊन श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
याप्रसंगी श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख , उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, शेगावचे तहसिलदार श्री बाजड, तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment