❝अजित वैतकार यांनी घारोड शाळेला प्रथमोपचार पेटी दिली भेट ❞
❝अजित वैतकार यांनी घारोड शाळेला प्रथमोपचार पेटी दिली भेट ❞
खामगाव प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घारोड येथील एखाद्या विद्यार्थ्यांला दुखापत झाली तर त्याला प्रथमोपचार मिळावे यासाठी दिव्यांग अजित वैतकार यांनी प्रथमोपचार पेटी भेट दिली आहे.या पेटीचा स्विकार उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्रीकृष्ण खंडारे व शिक्षक गजानन काळे यांनी केला.यावेळी विशाल खरात, रेखा भुंबरे,सुरेश राऊत,साहेबराव हिवराळे, कृष्णा वाईकर,विनोद तिळेवाड,प्रियंका लेवडे उपस्थित होते.
ही प्रथमोपचार पेटी शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे.अजित वैतकार यांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जाण असून समाजासमोर खूप मोठा आदर्श आपल्या कृतीतून त्याने ठेवला आहे.ही पेटी दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लता अनंता नरवाडे यांनी त्यांचे आभार मानले आहे.
प्रथमोपचार पेटीमुळे आवश्यक वैद्यकीय साहित्य त्वरित उपलब्ध होते, ज्यामुळे शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अपघात किंवा दुखापत झाल्यास त्वरित काळजी आणि मदत मिळू शकते.
याप्रमाणे प्रथमोपचार पेटी भेट दिल्यामुळे, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ती खूप उपयोगी ठरणार आहे.
Comments
Post a Comment