*प.पू.नानामाऊली काकामाऊली यांचा जन्मउत्सव सोहळा संपन्न*
*प.पू.नानामाऊली काकामाऊली यांचा जन्मउत्सव सोहळा संपन्न*
खामगाव
संतोष आटोळे
प. पू. श्री नानामाऊली काकामाऊली यांचा जन्मउत्सव सोहळा श्री.क्षेत्र बरसाना धाम येथे दि.२७जुलै ते २९ जुलै २०२५ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमामध्ये दि.२७जुलै २०२५सकाळी ६ते ७ काकडा आरती,सकाळी ७.१५ ते १०लघु रूद्र आणि शांतिपाठ,सकाळी ७.३०ते११मार्तंड महिमा आणि श्री. कृष्णदास काकामाऊली चरित्रामृत पोथीचे पारायण,दुपारी १२ वा. नैवैद्य,आरती, सायं ७वा अंजनगावसुर्जी चे मठाधिपती श्री. जितेंद्रनाथ महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते.
दि.२८जुलै २०२५रोजी सकाळी ६वा. काकडा आरती, सकाळी ७ते११.३० श्री. मार्तंड महिमा आणि श्री. कृष्णदास चरित्रामृत पोथीचे पारायण,सकाळी ११.३० वा नैवैद्य आरती,दुपारी ३.३०वा सद्गुरु सेवा मंडळ खामगांव महिलांचे भजन.
सायं.०५.३० वा करुणा त्रिपदी.
सायं. ०७.००वा ह.भ.प.डॉ.नंदिनी कडुस्कर संगीत विशारद,आचार्य (PHD)नागपूर यांचे कीर्तन झाले.
मंगळवार दि.२९ जुलै २०२५ रोजी सकाळी ०६.०० वा काकडा आरती, सकाळी ७ते १०.३०वा.श्री मार्तंड महिमा आणि श्री कृष्णदास काका माऊली चारित्रामृत पोथीचे पारायण.
सकाळी ६वा. काकडा आरती, सकाळी ७ते १०.३० वा श्री मार्तंड महिमा आणि श्री. कृष्णदास काका माऊली चरीत्रामृत पोथीचे पारायण.
सकाळी ८.३० वा.श्री सद्गुरु पादुका पूजन,सकाळी१०.४५ते ११.४५ वा नामधून, सकाळी १२वा नैवद्य आरती, दुपारी १२.३० ते ३.०० महाप्रसाद, सायं.५वा.करुणा त्रिपदी, सायं ६वा पालखी सोहळा संपन्न झाली. तद्नंतर रात्री ८वा भजना च्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता श्री. कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळ बरसाना यांच्या सेवेकर्यानी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment