नांदुरा शहरातील इतिहासाची साक्ष पोळा वेस नष्ट होण्याच्या मार्गावर लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील काय सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा पेठकर यांची मागणी
नांदुरा शहरातील इतिहासाची साक्ष पोळा वेस नष्ट होण्याच्या मार्गावर लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील काय
सामाजिक कार्यकर्ते
सुरेश दादा पेठकर यांची मागणी
नांदुरा
सुरेश खानचंदानी
शहरातील इतिहासाची साक्ष जुना वारसा शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरील मुस्लिम धर्म बांधवांचे तसेच हिंदू धर्मीय बांधवांचे प्रमुख देवस्थाने भावसार देवी मंदिर व जामा मजीद या मार्गावर जवळपास 1950 च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या नांदुरा शहरातील पवित्र ज्ञानगंगा नदीपात्रालगत ऐतिहासिक परकोट भिंतीसह भव्य वेस बांधण्यात आली तत्कालीन लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सेठ नारायण भाईजी गोरले यांच्या कार्यकालात बांधण्यात आली या ठिकाणी नांदुरा शहरातील सर्वात मोठा हिंदू धर्मीय बांधवांचा बैलपोळा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत होता परंतु सध्याच्या परिस्थितीत वर्तमान युगात अनेक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने बैलांची संख्या कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी पोळा भरण्यात येत नाही आज नांदुरा शहराच्या वैभवात घालणारी पोळावेस ही जीर्ण अवस्थेत भगनावस्थेत नष्ट होण्याच्या मार्गावरआहे
नांदुरा नगरपालिकेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक नगराध्यक्ष यांनी एक दमडीही खर्च केली नाही आज नांदुरा शहरातील या मार्गावरून सर्व धर्मीय मोठ्या थाटात या भागातून जातात परंतु नगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी ने शहरात कोट्यावधीचे विकास कामाचे निधी प्राप्त केलेले आहेत परंतु या भागात कोणत्याही प्रकारची एक दमडीही लोकप्रतिनिधी खर्च करू शकले नाहीत याची खंत व खेद नांदुरा शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये व रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या विषयी जनमानसात तीव्र स्वरूपाचा रोष व आक्रोश निर्माण झालेला आहे याबाबत नांदुरा शहरातील सामाजिक क्षेत्रातील चळवळीतील कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा पेठकर यांनी बरेच वेळा लोकप्रतिथी व नगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याच्या निदर्शनास नांदुरा शहरातील ह्या ऐतिहासिक पोळावेस वास्तू बाबत बरेच वेळा विकास कामाबाबत जीर्णोदराबाबत निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केल्या परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी नगर परिषद नांदुरा यांनी हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे याचा नांदुरा शहरातील सर्वसामान्य तीव्र स्वरूपाची नाराजी पहावयास मिळत आहे याची दखल घेणे क्रम प्राप्त आहे व याचा जीर्णोद्धार विकास होणे नांदोरा शहराच्या वैभव याची साक्ष असलेली पोळावेस नष्ट होण्यापासून वाचेल असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा पेठकर यांनी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून त्या भागातील रहिवासी नागरिकांच्या भावना समजावून घेतल्या
Comments
Post a Comment