शासना कडून पगार घेणारे शिक्षकांचे शिकवणी क्लासेस बंद करा अन्यथा निलंबीत करा.......सुरज यादव
शासना कडून पगार घेणारे शिक्षकांचे शिकवणी क्लासेस बंद करा अन्यथा निलंबीत करा.......सुरज यादव
खामगांव :
(का प्र)
अ. भा. ग्रा. पत्रकार संघ द्वारा आरोग्य समिती विदर्भ आरोग्य प्रमुख सुरज यादव यांनी दिनांक 30 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता अश्या आश्याचे निवेदन गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण केंद्र बुलढाणा यांना पत्राद्वारे सादर करून निदर्शनास आणून दिलेले आहे की मागील काही आठवड्या पूर्वी वसाडी, नांदुरा तालुक्यातील दहावीच्या एका विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षकाच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. हे खूप गंभीर बाब आहे. या प्रकरणाचे मागचे मुळ कारण काय हे पोलीस तपासात समोर येऊ शकते पण अशी परिस्थिती कोणत्याही दुसऱ्या विद्यार्थ्यावर येऊ नये म्हणून सर्व शाळेतील शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागण्याची आणि योग्य वागणूक देण्याची विनंती करावी. काही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकवणी वर्गात (tuition class) मध्ये सामील होण्यासाठी त्रास देतात. अश्या प्रकारची काही तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. शासनासकडून पगार मिळवणारे शिक्षक शिकवणी वर्ग चालवत आहेत हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. शासन मान्यता प्राप्त शाळांमधील काही कर्मचारी असलेले काही शिक्षक / शिक्षिका त्यांच्या पत्नी / पतीच्या नावाने शिकवणी वर्ग चालवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. स्वयंअर्थसहाय्य शाळांमधील (private English medium school) काही शिक्षक विद्यार्थ्यांना सतत त्रास देत आहेत आणि त्यांना त्यांच्या शिकवणी वर्गात सामील होण्यास भाग पाडत आहेत. जर कोणताही विद्यार्थी त्यांच्या शिकवणी वर्गात सामील झाला नाही तर ते त्यांना आंतरिक गुण (internal marks) देणार नाही याचा धाक दाखवून आणि अपशब्द बोलून अपमानित करून त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देतात हे देखील आमच्या निदर्शनास आले आहे. हे अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाकडून - शाळा व्यवस्थापनाकडून चांगली पगार मिळत असल्यावरही बेकायदेशीर शिकवणी वर्ग (tuition class) चालवून सदर लोक शासनाची आणि व्यवस्थापनाची फसवणूक करत आहे आणि पालकांचा आर्थिक शोषण ही करत आहे. म्हणून आपणांस विनंती की शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शाळेतील शिक्षकांवर कठोर कारवाई करा, त्यांचे शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद करावे अन्यथा त्यांना त्यांच्या सेवेतून निलंबित करावे जेणेकरून हजारों विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासापासून वाचवता येईल. कृपया या पत्राची गंभीर दखल घ्यावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अन्यथा बुलढाणा येथील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांसमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल ज्याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील. असा ईशारा सुद्धा या निवेदनाद्वारा देण्यात आलेला आहे या निवेदनावर सुरज यादव , राजु घाटे , रुपेश कलंत्री , सिद्धेश्वर निर्मळ , प्रदीप शमी , सुमित शर्मा आदि पत्रकार लोकांच्या स्वाक्षऱ्या आहे अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रुपेश कलंत्री यांनी दिली
Comments
Post a Comment