भीमातीर ते तापीतीर आदिशक्तीचा परतीचा प्रवास.रिमझिम पावसांच्या सरीत ज्ञानोबा तुकोबाचा गजर..बुलढाणा, राजुर भक्त गणांच्या वतीने भव्य स्वागत, महाप्रसादाचे आयोजन
भीमातीर ते तापीतीर आदिशक्तीचा परतीचा प्रवास.
रिमझिम पावसांच्या सरीत ज्ञानोबा तुकोबाचा गजर..
बुलढाणा, राजुर भक्त गणांच्या वतीने भव्य स्वागत, महाप्रसादाचे आयोजन.
बुलढाणा:
भेटी लागे जीवा पांढरीश पांडुरंग परमात्म्याची आषाढी वारी पूर्ण करून आदिशक्ती मुक्ताई माता आपल्या मूळ स्थानी मुक्ताईनगर साठी परतीच्या प्रवासाला निघाली आहे. भीमातीर ते तापीतीर दिंडी सोहळा प्रमुख वारकरी भूषण हभप रविंद्र महाराज हरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 जुलैला बुलढाण्यात आदिशक्तीचे आगमन झाले. यावेळी मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत बुलढाणा राजुर येथील आदिशक्ती भक्तगण,श्री सद्गुरु विष्णूमाऊली प्रतिष्ठान,आझाद हिंद शेतकरी संघटना,ग्राम स्वराज्य समिती,राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आले.
बुलढाण्यावरून मोताळ्याकडे आदिशक्ती पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना राजुर घाटातील संकट मोचन हनुमंताच्या मंदिरात पालखीचा दुपारचा विसावा आणि महाप्रसादाची सेवा दरवर्षीप्रमाणे श्री सद्गुरु विष्णूमाऊली प्रतिष्ठान व रोठे पाटील परिवार राजुर बुलढाणा यांच्याकडे नियोजित प्रसाद स्वरूप देण्यात आली.
ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात आदिशक्ती पालखी सोहळा रिमझिम पावसामध्ये बुलढाण्यात दाखल झाला असताना पावसांच्या सरीचा आनंद घेत मुक्ताई भक्तगणांनी पालखी सोहळ्यात पायी चालत आदिशक्तीला घाटातील विसाव्यापर्यंत निरोप दिला. बुलढाणा राजुर येथील आदिशक्तीचे भक्तगण, श्री सद्गुरु विष्णू माऊली प्रतिष्ठान, ग्राम स्वराज्य समिती, आझाद हिंद शेतकरी संघटना यांच्या सेवाभावातून आदिशक्तीच्या दिंडी सोहळ्यातील वारकरी आणि भक्तगणांना महाप्रसादाचा विसावा संकटमोचन हनुमंताच्या प्रांगणात देण्यात आला. त्यानंतर आदिशक्तीने वाघजाळ फाटा येथील विठ्ठल रुक्मिणी आश्रमात मुक्कामी विसाव्यासाठी प्रस्थान केले.
Comments
Post a Comment