सात ग्रॅम सोन्याची अंगठी प्रामाणिक पणे परत केली.शिर्डी दिव्यांग अधिवेशन निघताना प्रवासातील घटना
सात ग्रॅम सोन्याची अंगठी प्रामाणिक पणे परत केली.
शिर्डी दिव्यांग अधिवेशन निघताना प्रवासातील घटना
नंदुरबार :--- शिर्डी येथील दिनांक 14/ 7 /25 रोजी दिव्यांग कर्मचारी /अधिकारी संघटनेचे अधिवेशनासाठी नंदुरबार हुन बरेच पदाधिकारी व सदस्य मंडळी दिनांक 12 शनिवार रोजी अडीच वाजता निघाले. त्यानंतर मालेगाव मनमाड हायवेवर गाडी शिर्डीच्या दिशेने निघाले होती.मध्येच सर्वांना चहाची तल्लफ लागली. मग एके ठिकाणी म्हणजे हॉटेल साई माऊली वर गाडी थांबली. व सर्वजण चहापाणीसाठी उतरले .व काहीजणांनी कुरकुराचे पाकीट, बिस्कीटचे पाकीट खाण्यासाठी घेतले. चहा खरोखरच वाखानण्याजोगाच होता .पैसे वगैरे पेड केल्यानंतर गाडी मनमाडच्या आसपास आली. आणि दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भास्कर कुवर यांच्या बोटातील सोन्याची अंगठी सात ग्रॅमची बोटात दिसलीच नाही. बराच वेळ भास्कर कुवर सर खाली गाडीत, खिशात तपासात होते. परंतु अंगठी काही सापडली नाही .शेवटी गाडी साईडला उभी करून सर्वांनी गाडीत मोबाईल स्टार्च ऑन करून गाडीच्या कानाकोपऱ्यात पाहिले. परंतु अंगठी काही सापडली नाही.तेव्हा सर्वच जण टेंशन मधे दिसुन आले. तेव्हा कुवर सर म्हणाले की जाऊ द्या. असेल कपाळात... तर भेटेल टपालात... म्हणून विषय बंद केला .परंतु थोड्याच वेळात कुवर सरांना आठवले की चहा स्टॉल वरच उभ्याने बिस्किट पुडा एका हाताने खात असताना दुसऱ्या हातात चहाचा ग्लास होता .
आणि नेमके त्याच वेळेस सोन्याची अंगठी तिथेच पडली असावी असा अंदाज सर्वांना सांगितला. चहा पिऊन निघताना कोणीतरी विचारले होते की हा एरिया कोणता आहे म्हणून तेव्हा हॉटेलवाला म्हणाला होता की घोडेगाव चौकी आहे. तेव्हा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील सरांनी आसिफ शेख जिल्हाध्यक्ष यांचे चिरंजीव मुसद्दिक याला सांगितले की नेट ओपन कर आणि गोरेगाव चौकी सर्च कर. अगदी शून्य मिनिटात हॉटेल साई माऊली मोबाईल मध्ये दिसली.नंतर मोबाईल नंबर दिसतो का ते पण सर्च केले आणि मोबाईल नंबर पण दिसला .व लगेच मनोहर पाटील सरांनी फोन लावला लगेच समोरच्यांनी फोन उचलला आणि पाटील सरांनी हा फोन नंबर हॉटेल साई माऊलीचाच आहे का कन्फर्म केले .तिकडून संबंधिताने होय म्हटले आणि वेळ न घालवता मनोहर पाटील सरांनी सांगितले की पंधरा-वीस मिनिटांपूर्वी चहा प्यायला आमची टबेरा गाडी थांबवली होती. तेव्हा दोन्ही कुबड्या घातलेले कुवर सर म्हणून आहेत. त्यांच्या बोटातील सात ग्रॅमची सोन्याची अंगठी समोरच पडलेली दिसत आहे. तेव्हा मालकाने बाहेर येऊन पाहिले तर खरंच अंगठी सापडली. नंतर व्हिडिओ कॉल करून अंगठी तीच आहे का हे कन्फर्म केले .तेव्हा तो हॉटेल साई माऊलीचा मालक एवढ्या प्रामाणिक पणे म्हटला की माऊली तुम्ही उद्या या परवा या तुमची अंगठी व्यवस्थित सांभाळून ठेवतो. आम्ही अगदी गरीब माणस आहोत. प्रामाणिकपणे व्यवसाय करून आमचे कुटुंब सुखी आणि समाधानाने जगत आहोत. तेव्हा केव्हाही या आणि अंगठी घेऊन जा. भास्कर कुवर सरांचा सर्वांच्याच त्यांच्या प्रामाणिकपणामुळे डोळ्यात पाणी आले होते. आजही अशी देव माणसे या जगात आहेत म्हणून ही चराचर सृष्टी चालत आहे .शिर्डीचे अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पाच वाजता निघालो. पण ट्रॅफिक मुळे जवळपास दोन ते अडीच तास उशिरा घोडेगाव चौकीवर पोचलो. त्याच्या आधी सकाळी पण हॉटेल साई मालकाचा फोन आला .आणि रस्त्याने सुद्धा तीन-चार वेळेस फोन येऊन गेला. आणि रात्रीची वेळ आहे म्हणून निघून तर नाही गेलेत अशी शंका त्यांना आली. आम्ही जवळपास साडेआठ वाजेला हॉटेल साई माऊली वर पोहोचलो .तेव्हा त्यांच्या सर्वच कुटुंबाच्या चेहऱ्यावरच्या आनंद पाहण्यासारखा होता. आम्ही येताना शाल श्रीफळ, फुलहार घेऊन आलो होतो. तो त्यांच्या दोघा पती-पत्नीच्या गळ्यात घातला. आणि कुवर सरांनी 1100 रुपये रोख बक्षीस दिले. आणि अंगठीही घेतली. वास्तविक पाहता महांगाईच्या जमान्यात, भ्रष्टाचारी जमान्यात, गुंडागर्दीच्या जमान्यात असे कुटुंब की ज्यांच्यामुळे इथे मानावेच लागते की देव आहे आणि तो अशा स्वरुपातच भेटत असतो. अच्छा करो अच्छा होगा ! बुरा करो तो बुरा होगा ! कारण भास्कर कुवर सरांसारखा दुसरा अवलीया माणुस दुसरा नाही. त्यांनी गेली तीस वर्षे सर्वस्वी दिव्यांग बांधवांसाठी घालवले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने मतिमंद मुलींची निवासी शाळा नंदुरबार येथे जवळपास गेली सोळा वर्षापासून स्वखर्चाने भाड्याच्या इमारतीत चालवत आहेत. त्यांच्या पुण्याईने त्यांना सात ग्रॅमची सोन्याची अंगठी परत मिळाली. आणि ज्यांनी प्रामाणिकपणे परत केली ते हॉटेल साई मालक पुंडलिक विक्रम हलवार आणि त्यांच्या पत्नी सौ. राधा पुंडलिक हलवार ही गरीब परिस्थितीत चहा स्टॉल चालवतात. पण प्रामाणिकपणे या देव माणसांनी सोन्याची अंगठी परत केली. धन्यवाद सोबत राज्य उपाध्यक्ष भास्कर कुवर, जिल्हाध्यक्ष आसिफ शेख ,सचिव आनंदराव करंकाळ, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील सर, नंदुरबार तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील ,तालुका सचिव राजेंद्र बोरसे, जितेंद्र गिरासे, चतुर पाटील, मुसद्दीक आदी उपस्थित होते.
ही संपूर्ण माहिती
आनंदराव करंकाळ जिल्हा सचिव दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटना मुंबई - 32 यांनी दिव्यांग शक्तीला प्रसिद्धीला दिली आहे
Comments
Post a Comment