जागोजागी पडले रेती व वेस्टेज चे ढीग यातून होत आहे दिव्यांग निर्माण!प्रशासन लक्ष देईल काय?
जागोजागी पडले रेती व वेस्टेज चे ढीग
यातून होत आहे दिव्यांग निर्माण!
प्रशासन लक्ष देईल काय?
खामगाव
(शेखर तायडे)
गल्लो गल्ली वॉर्ड वॉर्डातील रस्त्यावर जागोजागी पडले रेती , गिट्टी बांधकाम वेस्टेज चे ढीग यातून शहरात होत आहे पदचारी व वाहनांना त्रास यातून अपघात होत असल्याने त्यांना होत आहे शारीरिक व वाहनांचे नुकसान
खामगाव शहरासह परिसरामध्ये प्रत्येक गल्ली त मुख्य रस्त्यावर बांधकामासाठी लागत असलेली रेती मुरूम विटा चे तुकडे गीट्टी रस्त्यावर विखरून पडली आहे
शहरामध्ये खाजगी मालमत्ता धारक यांची, सरकारी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे कामे सावकाश होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे
वाहने स्लीप होऊन गाड्यांचे नुकसान
व काही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत तर काही पूर्णतः झाली आहे
या साठी वापरण्यात आलेले साहित्य रस्त्यावरच पसरून त्यामुळे
रस्त्यावर आधीच ढोरांची वर्दळ सोबतच सडक छाप कुत्रे यांच्या त्रासासोबतच आस्तव्यस्त उभी राहत असलेली वाहने
रस्त्यावर पडलेल्या या बांधकामाच्या वेस्टेजमुळे
पाई चालताना त्याच्या ठोकर लागत तर आहेच पण या वेस्ट साहित्यामुळे वाहनाची घसरगुंडी होत गाड्या स्लीप होत आहे यातूनच अपघात होत हातपाय तोडून घरात बसावे लागत आहे
यासाठी प्रशासनाने कार्यवाही साठी कडक धोरण तयार करीत पाणी पावसाच्या दिवसामध्ये अंकुश निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे
Comments
Post a Comment