*राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यासाठी जन आंदोलन**शासनाने दिव्यांगांचा मागण्या लक्षात घेत तातडीने मार्गी लावाव्या आणि दिव्यांगांना न्याय द्यावा..... अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा. काँग्रेस पार्टी श. प.*
*राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यासाठी जन आंदोलन*
*शासनाने दिव्यांगांचा मागण्या लक्षात घेत तातडीने मार्गी लावाव्या आणि दिव्यांगांना न्याय द्यावा..... अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा. काँग्रेस पार्टी श. प.*
हिंगणघाट : - दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे *प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले* यांच्या मार्गदर्शनाखाली *दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांच्या नेतृत्वात* आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग बांधव यांचे उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शहरात दिव्यांग बांधवांना शासनाद्वारे दिव्यांग महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वच्छतागृह द्यावे त्याचबरोबर दिव्यांगाच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊन त्यांना नोकरी देण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांग बांधवांना एक स्वीकृत प्रतिनिधी शासनातर्फे नियुक्त करण्यात यावा. तसेच विधान परिषदेमध्येही मा. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये एक दिव्यांगाचा प्रतिनिधी घेण्यात यावा तसेच दिव्यांग निराधारांना दरमहा रुपये दहा हजार संजय गांधी योजनेत पेन्शन देण्यात यावे. शासनाने दिव्यांग नागरिकांना व्यवसायासाठी विनाअठ दोनशे स्क्वेअर फुट ची जागा व्यवसायासाठी देण्यात यावी. तसेच शासनाने दिव्यांग बांधवांना नवीन गॅस कनेक्शन मोफत देण्यात यावे. त्याचबरोबर दिव्यांगांना शहरात व ग्रामीण भागामध्ये घरटॅक्स, पाणीपट्टीमध्ये शंभर टक्के सूट देण्यात यावी. गुंठेवारी मध्ये दिव्यांगांना शंभर टक्के सूट देण्यात यावी. अंतोदय धान्य योजने अंतर्गत दिव्यांगाना धान्य त्वरित देण्यात यावी. अशा विविध मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे पदाधिकारी तसेच सदस्य यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जनआंदोलन केले.
प्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गुणवंता कोठेकर, हि. शहराध्यक्ष बालूभाऊ वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर दिव्यांग सेलचे पदाधिकारी सचिन भजभुजे, जगदीश देवतळे, सतीश गोळकर, पांडुरंग मोहाड, अभिलाष कांबळे, अमोल कांडे अनिल क्षीरसागर, सुनील जुमडे, देवराव चापले, महेंद्र वैद्य, शुभांगी आठवले, वनिता भजभुजे, वनिता ब्राह्मणे, मीना पुनासे, नंदा गेडाम, सुनिता बावने, शितल सहारे, उज्वला महाकाळकर , मीनाक्षी पेरमे, संदीप डोळस, गणेश घुंगरूड, राजू सराटे, मुकिंद शास्त्रकर, सुनील खेडकर, संजय दरबेसवार , संतोष ठाकरे व समस्त दिव्यांग बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment