_अ.भा. कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे__गुणवंत विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा गुणवत्तेत वाढ; उत्तम रोजगारनिर्मितीसाठीही योगदान द्यावे– *पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर
_अ.भा. कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे_
_गुणवंत विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा
गुणवत्तेत वाढ; उत्तम रोजगारनिर्मितीसाठीही योगदान द्यावे
– *पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर*
मनोज भगत
हिवरखेड
अकोला दि. 20 : नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमधून अनेक गुणवंत समोर येत असून, ही गुणवत्ता कौतुकास्पद आहे. त्यांना उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री व
जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
अ. भा. कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व समाज मेळावा येथील जि प कर्मचारी भवनात आज झाला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक शिवदास गाडेकर महाराज व अध्यक्षस्थानी अनिल गावंडे होते. माजी आमदार नारायण गव्हाणकर,
प्रमुख मार्गदर्शक प्रा मोहन खडसे होते यांच्यासह अनेक मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शैक्षणिक सत्र 2025-26 मधील दहावी व बारावी गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री श्री. फुंडकर पुढे म्हणाले की, समाजातून अनेक विद्यार्थी हा पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांचे मेरिट कौतुकास्पद आहे. त्यांना योग्य रोजगाराची संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता समाजातील मान्यवरांनी पुढाकार घ्यावा. अनेकविध संधींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना उत्तम रोजगार मिळवून देण्यात योगदान द्यावे. संस्थेकडून दरवर्षी मेळावा आयोजित करण्यात येतो व अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हॉल निर्माण करण्यासाठी निश्चित मदत करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्कार व संस्कृतीची जपणूक करावी व विकासाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले व पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल सुरे, पद्मावती टिकार यांनी केले तर आभार किशोर मोरोकार यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment