स्व. ना. गो. अनोकार पत्रकारिता पुरस्काराने पत्रकार अनिल गवई यांचा गौरव
स्व. ना. गो. अनोकार पत्रकारिता पुरस्काराने अनिल गवई यांचा गौरव
खामगाव : स्व. ना.गो.अनोकार कुटुंबीयांच्या वतीने दिला जाणारा स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ लोकमतचे उपसंपादक अनिल गवई यांना प्रदान करण्यात आला. मंगळवार, २९ जुलै रोजी सायंकाळी स्थानिक पत्रकार भवन येथे हा दिमाखदार समारंभ पार पडला.
या पुरस्काराचे स्वरूप २१,००० रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून खामगाव एज्युकेशन सोसायटीचे महादेवराव भोजने, श्रीमती उषाताई अनोकार, खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष प्रशांत देशमुख तसेच पुरस्कार विजेते अनिल गवई हे उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेतील अनिल गवई यांच्या अभ्यासपूर्ण, प्रामाणिक आणि जनसामान्यांशी जोडलेल्या कामगिरीची स्तुती केली. राजेश राजोरे, उषाताई अनोकार, महादेवराव भोजने, किशोरआप्पा भोसले ,प्रशांत देशमुख आणि लुकमान परवेज यांनी आपल्या भाषणांतून पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकला.
या वेळी प्रास्ताविक ॲड. क्षितीज अनोकार, परिचय उमाकांत कांडेकर, सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे, आणि आभार प्रदर्शन डॉ. दुर्गेश अनोकार यांनी केले. श्रीकांत भुसारी आणि शिवाजी भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी वृषालीताई बेंदरकर, माया अनोकार, कल्पना अनोकार, जसवंतसिंह शीख, डॉ. अनिता कौर चव्हाण, ॲड. परमवीर चव्हाण, प्रा. हनुमंत भोसले, मनिष देशमुख, धनराज कन्नर, तरूणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, कोषाध्यक्ष अविनाश सोनटक्के, मनोज सुळोकार, अनूप गवळी, संभाजी टाले, सिद्धांत उंबरकर, आणि इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment