श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखीचे आगमन खामगांव शहरात येण्यापुर्वी पालखी मार्गातील रस्त्यांची डागडुजी व साफ सफाई इतर कामासाठी काँग्रेस पक्षाचे निवेदन
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखीचे आगमन खामगांव शहरात होण्या पुर्वी पालखी मार्गातील रस्त्यांची डागडुजी व साफ सफाई करण्या बाबत व पालखीच्या आगमनाच्या दिवशी निर्जंतुकीकरण करण्याकरिता औषधाची फवारणी तसेच पावडरची फवारणी करणे बाबत आज नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी देवकते सर नगर परिषद खामगाव यांना
निवेदन स्वप्निल संजय ठाकरे शहर अध्यक्ष व किशोर बाबासाहेब भोसले कार्याध्यक्ष खामगांव शहर काँग्रेस कमिटी खामगांव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरात येणार आहे.आपल्या शेगाव येथील श्री संत गजनान महाराज संस्थांनच्या पालखीने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असुन ही पालखीचे आपल्या खामगांव शहरात दिनांक 30 जुलै 2025 वार बुधवार रोजी आगमन होणार आहे या पालखीमध्ये सहभागी वारकरी व पालखीचे दर्शन करण्याकरता भक्त जणांची मोठ्या प्रमाणात मादीयाळी असते.अश्या वेळेस आपण आपल्या खामगांव शहरातील रस्त्यांची परिस्थीती पाहिल्यास या रस्त्यांची पार दुरवस्था झालेली असुन रस्त्यात ठीक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडुन त्यात पाणी साचुन कुठे डबके तर कुठे चिखल निर्माण झालेला आहे.या मुळे पालखीतील वारकऱ्यांना व पालखीच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांना त्रास होईल हा त्रास दुर करण्या करिता संपुर्ण खामगांव शहरातील ज्या ज्या मार्गाने पालखी जाणार आहे त्या सर्व मार्गातील रस्त्यांची तत्काळ डागडुजी करण्यात यावी तसेच या सर्व मार्गाची साफ सफाई करुण निर्जंतुकीकरण करण्याकरिता औषधाची फवारणी तसेच पावडरचा छडकाव कऱण्यात यावा आपण अमच्या या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी
तर
सार्वजनिक बांधकाम विभागनाही रस्ता दुरुस्ती करावी चे पण निवेदन
--
मा.श्री.मुख्यकार्यकारी अभियंता साहेब.
सार्वजनिक बांधकाम विभाग खामगांव. यांना ही निवेदन सादर करण्यात आले
श्री संत गजानन महाराज पालखीचे खामगांव येथुन शेगाव कडे प्रस्थान होण्या पुर्वी पर्यायी मार्गाची म्हणजे शेलोडी,तिंत्रव,जवळा,या मार्गाची डागडुजी करण्या बाबत.तसेच पालखी च्या मुख्य मार्गावर ठीक ठिकाणी महीलान करिता फिरते शोचालय व टॉयलेट ची व्यवस्था करन्यात यावी असे
स्वप्निल संजय ठाकरे शहर अध्यक्ष व किशोर बाबासाहेब भोसले कार्याध्यक्ष श्री संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरात येणार आहे.आपल्या शेगाव येथील श्री संत गजनान महाराज संस्थांनच्या पालखीने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असुन ह्या पालखीचे आपल्या खामगांव शहरात दिनांक 30 जुलै 2025 वार बुधवार रोजी आगमन होणार आहे.खामगांव येथे एक दिवसाचा मुक्काम करुण ही पालखी दुसऱ्या दिवशी शेगाव कडे प्रस्थान करणार असुन या वेळेस पालखी सोबत लाखो भाविक शेगाव कडे मुख्य मार्गाने जात असतात या मुळे मुख्य रस्ता पूर्णतः बंद झाल्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक शेगाव कडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा म्हणजे शेलोडी,तींत्रव,जवळा या मार्गाचा वापर करित असतात अश्या वेळेस आपण या पर्यायी मार्गाच्या रस्त्यांची परिस्थीती पाहिल्यास ह्या रस्त्यांची पार दुरवस्था झालेली असुन या रस्त्यात ठीक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडुन त्यात पाणी साचुन कुठे डबके तर कुठे चिखल निर्माण झालेला आहे.या मुळे दर्शनास जाणाऱ्या व दर्शन करुण येणाऱ्या भक्तांना खुप त्रास होईल हा त्रास दुर करण्या करिता शेलोडी,तींत्रव,जवळा,शेगाव कडे जाणाऱ्या या पर्यायी मार्गाची तत्काळ डागडुजी करण्यात यावी तसेच शेगाव कडे जाणाऱ्या पालखीच्या मुख्य मार्गावर ठीक ठिकाणी महीलान करिता फिरते शौचालय व टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी.तरी आपण अमच्या या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती या निवेदनातून केली आहे
यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment