*कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर यांच्या उपस्थितीत ६५ जणांचे रक्तदान*
*कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत ६५ जणांचे रक्तदान*
खामगाव:- (उमाका)
दि. २२ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, सागर फुंडकर यांच्या मार्गदर्शनात सामान्य रुग्णालय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांच्या उपस्थितीत सामान्य रुग्णालयात सुमारे ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराला श्याम पाटेखेडे , नरेंद्र शिंगोटे, राजेंद्र धनोकार, संजय शिंनगारे, राम मिश्रा यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदाधिकारी यांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.
Comments
Post a Comment