मराठी पत्रकार परिषद तालुका कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण
मराठी पत्रकार परिषद तालुका कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण
प्रतिनिधी | संग्रामपूर
तालुक्यातील पत्रकारांना आपसी संवाद करण्यासाठी हक्काची जागा म्हणून तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल येथे कार्यालय उघडण्यात आले.
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नीत संग्रामपुर तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवार 19 जुलै रोजी वृक्षारोपण करून कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले.
याप्रसंगी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितभाई राजपुत,कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख,वसिम शेख आणि जिल्हासचिव शिवाजीराव मामनकर,जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे,सत्यशोधन समिती जिल्हा कार्याध्यक्ष अझहर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. संग्रामपुर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांनी प्रस्तावना करतांना कार्यालय स्थापनेचा उद्देश आणि संघटनेच्या पुढील कामाची रुपरेषा विषद केली. जेष्ठ पत्रकार वासुदेवराव दामधर यांनी पत्रकारीतेतील आवाहनांवर पत्रकारांना संबोधित केले तर जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे यांनी पत्रकारांनी संघटीत राहणे व आवाहने पेलत तळागाळातील सामाजिक समस्या समर्थपणे मांडत पत्रकारीता करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष रणजितभाई राजपुत यांनी पत्रकारांच्या आरोग्य विषयक समस्यांसाठी संघटनेकडुन सहकार्याच्या योजने विषयी आपले विचार मांडले तर पुढे त्यांनी पत्रकारीतेतील पुरस्कारांविषयी विचार मंथन सुरु असल्याचे सांगतानाच तालुका पत्रकार संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला तर आपल्या मार्गदर्शनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख आणि वसिम शेख यांनी संग्रामपुर तालुका पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेतांना एकजुटीचा गौरवपुर्ण शब्दात उल्लेख केला.या कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्रसंचालन जिल्हा समिती सदस्य श्यामभाऊ देशमुख यांनी केले तर आभार तालुका सचिव विवेक राऊत यांनी व्यक्त केले.कार्यालयाचे उद्घाटना नंतर जवळील विश्वकर्मा मंदिराच्या पटांगणावर आणि तालुका कार्यालयाचे समोर वृक्षारोपण करण्यात आले.
यापुढेही समाज उपयोगी विविध उपक्रम तालुका पत्रकार संघाकडून राबविण्यात येतील अशी ग्वाही तालुका पत्रकार संघाच्या वतीने ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली.
व चहा फराळाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी जिल्हास्तरीय समितीतील आकाश पालीवाल, जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी समिती सदस्य स्वप्निल देशमुख,
तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी,तालुका सहसचिव शेख रफिकभाई यांचेसह डिजीटल मिडीया तालुकाध्यक्ष गोपाल धर्माळ,उपाध्यक्ष भगवान पाखरे, तालुका सचिव निलेश तायडे, संघटक श्यामभाऊ ईंगळे, मोहन सोनोने यांचे सह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment