उद्या खामगावात भक्तिमय वातावरण दोन दिवस श्रींचा महापूर
उद्या खामगावात भक्तिमय वातावरण
दोन दिवस श्रींचा महापूर
खामगाव
संतोष आटोळे
संत श्री गजानन महाराज पंढरपूर येथून विठोबा रुक्माई चे दर्शन करून वारकरी पालखी सोहळ्यास खामगाव शहरात उद्या आगमन होणार आहे
संपूर्ण जगात शक्तिपीठ असलेलं शेगाव निवासी संत श्री सद्गुरु गजानन महाराज पालखी सोहळा उद्या दिनांक 30 जुलै 2025 रोजी खामगाव शहरात पंढरपूर येथून श्रीहरी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून खामगाव येथे अंतिम विसावा घेत दिनांक 31 जुलै 2025 शेगाव येथे मार्गस्थ होत पालखी सोहळ्याचा अंतिम टप्पा ठरणार आहे
खामगाव शहरांमध्ये आगमन होताच विविध संस्था संघटना मंडळे कुटुंब हार फुले रांगोळी सुशोभीकरण करीत पालखी सोहळ्याचे व वारकऱ्यांचं स्वागत चौका चौकात गल्लोगल्ली दारासमोर करीत देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे विसावा राहणार आहे या दरम्यान पालखी सोहळ्याकरता संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील संत श्री गजानन भक्त दर्शन सोहळ्याचा भाग हजारोच्या संख्येने घेणार आहे
Comments
Post a Comment