अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे १ ऑगस्ट पासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यभरात विविध उपक्रम

अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे १ ऑगस्ट पासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यभरात विविध उपक्रम
 
खामगाव 
संतोष आटोळे 
दि. २७: अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने संघटनेचे केंद्रीय , महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्यातील, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने राज्यभरात १ ऑगस्ट ऑगस्ट पासून १५ पर्यंत ऑगस्ट पर्यंत  (पधंरवाडा) विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. 
याच उपक्रमाचे नियोजनातून संघटनेने १ ला टप्पा मध्ये जुन , जुलै मध्ये केंद्रीय संपर्कप्रमुख- प्रा. रवींद्र मेंढे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष - कैलासबापू देशमुख , केंद्रीय कार्यालय प्रमुख -बाबाराव खडसे केंद्रीय ह्यांच्या सह प्रदेशातील पदाधिकार्याचे वाढदिवसानिमित्त राज्यभरात वृक्षारोपण व विविध उपक्रम राबविलेले आहे.
पत्रकारांनी जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी  सामाजिक उपक्रम राबवावे असे पत्रकार संघाने धोरण ठरविल्यामुळे महाराष्ट्रतील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी जिल्हा,तालुका  बैठक घेऊन आपल्या जिल्ह्यांतील कार्यकारिणी, नुतनीकरण, व  जिल्हा,
तालुका स्तरावर वृक्षारोपण, रोगनिदान शिबिर, पत्रकार मेळावा, शालेय साहित्य वाटप आपल्या जिल्हा, तालुका स्तरावर करावे असे ठरविण्यात आलेले आहे.

३ ऑगस्टला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवशी पत्रकार सहकारी पतसंस्था शिरजगांव कसबा येथे दुपारी २ वाजता पत्रकार संवाद मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे.

 वरील कार्यक्रमात ,उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांचा कार्य गौरव सत्कार करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील पत्रकार व केंद्रीय , प्रदेश तथा महिला मंच प्रदेश कार्यकारिणी , हजर राहाणे अनिवार्य आहे.

 १५ ऑगस्टला संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफखान यासीनखान पठाण यांचा वाढदिवस असल्यामुळे पंधरवडा उपक्रमाचा समारोप यानंतर होणार आहे. त्यामध्ये उत्कृष्ट कार्य , जिल्हा बांधणी केलेल्या जिल्हा अध्यक्ष व पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. संघटनेच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात वरील प्रमाणे कार्यक्रम राबवावे. व तसा अहवाल केंद्रीय कार्यकारणीला पाठवावा. असे संघटनेने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले असल्याचे संघटनेचे सुरेश सवळे - केंद्रीय महासचिव ,अशोक पवार केंद्रीय सचिव - राजेंद्र भुरे, केंद्रीय उपाध्यक्ष ,प्रदिप जोशी -केंद्रीय उपाध्यक्ष , माणिकराव ठाकरे - केंद्रीय सदस्य,अंबादास सिनकर, अभिमन्यू भगत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे , गोपाल सरनायक प्रदेश - सचिव,सुरेशराव ढवळे - प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संघटक मनोज कमेट,
सुरज यादव विदर्भ आरोग्य समिती अध्यक्ष, अरूणभाऊ कुलथे - प्रदेश सल्लागार, जगदीश बुलबुल - मराठवाडा विभागीय अध्यक्ष,  प्रियंका केदार - महिला मंच विदर्भ
कार्याध्यक्ष, मंजुषा सागर - महिला मंच प्रदेश अध्यक्षा, कांचन मुरके - महिला मंच - प्रदेश सरचिटणीस , पायल बुलबुल - संभाजी नगर- महिला मंच जिल्हा अध्यक्षा 
प्रसिद्ध प्रमुख -सागर सवळे, शहजाद खान , नितीन पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.