महाराष्ट्राचे मुकूटमणी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवसानिमित्त चांदीची आकर्षक फ्रेम देवुन सानंदांनी केला सत्कार
महाराष्ट्राचे मुकूटमणी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवसानिमित्त चांदीची आकर्षक फ्रेम देवुन सानंदांनी केला सत्कार
खामगाव ः-
(संतोष आटोळे)
दि.22 जुलै 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस. त्यानिमित्त दि.23 जुलै 2025 रोजी खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मुंबई येथील देवगिरी बंगला येथे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेवुन
वाढदिवसानिमित्त दादांचा शाल, तिरंगा स्कार्प घालुन व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला व पेढा भरवुन त्यांचे तोंड गोड केले तसेच त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी व निरोगी,सुदृढ आरोग्यासाठी खामगाव मतदार संघातील समस्त राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
खामगाव नगरी ही 100 टक्के शुध्द चांदीच्या वस्तुंसाठी प्रसिध्द आहे. अनेक उत्कृष्ट प्रतीच्या चांदीच्या वस्तु,आकर्षक मुर्त्या,दागिने खामगावात तयार केले जातात.यामुळेच खामगाव शहराला सिल्व्हरसिटी असे सुध्दा संबोधले जाते. म्हणून माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना शुध्द चांदीपासुन बनवलेली आकर्षक चांदीची फ्रेम भेट दिली. या चांदीच्या फ्रेममध्ये उपमुख्यमंत्री ना.अजितदादांचा फोटो असुन छत्रपती शिवाजी महाराज,शाहु-फुले-आंबेडकर-महात्मा गांधी-मौलाना अबुल
कलाम आझाद यांची विचारधारा व सर्वधर्म समभाव जोपासणारे ना.अजितदादा पवार यांच्यासाठी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,महाराष्ट्राचा मुकूटमणी,आम्ही सर्व अजित पर्व, एकच वादा अजित दादा अशी विशेषणे वापरण्यात आली असुन सानंदा परिवार व खामगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमींजणांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राष्ट्रवादी नेते सनी ससाने हे उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये दि.11 जुलै ते 26 जुलैपर्यंत आयोजित आम्ही सर्व अजित पर्व या पंधरवाडा कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ रिल्स दादांना दाखवुन खामगाव मतदार संघातील कार्यक्रमांचा लेखाजोखा दादांकडे दिला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास सानंदांनी अजितदादांना दिला.
ते फोटो आणि रिल्स पाहुन सानंदांजी आपण खामगाव मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेचे काम अत्यंत जोमाने करीत आहात असे गौरवोद्गार काढुन उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
Comments
Post a Comment