महसूल दिनाचे औचित्य साधत ५ ऑगस्ट विशेष सहाय्य योजनेंतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन अनुदान वाटप
राज्यात महसूल दिन १ ऑगस्ट व महसूल सप्ताह १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजरा होणार
खामगाव, दि. ३१ (उमाका): राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन व १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येतो. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर महसुली कामे पूर्ण करणे, अभिलेख अद्ययावत ठेवणे, वसुलीचे उद्दिष्ट पार पाडणे, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्हाधिकारी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. याच धर्तीवर जिल्हा, उपजिल्हा व तालुका पातळीवरील अप्पर जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, लिपिक व वाहनचालक यांचा उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून गौरव करण्यात येतो.महसूल विभागाच्या सेवा, योजना व उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, नागरिकांमध्ये जागरूकता वाढविणे आणि शासनाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणे हा महसूल सप्ताह साजरा करण्यामागील मुख्य हेतू आहे.महसूल सप्ताहातील प्रमुख उपक्रम १ ऑगस्ट: महसूल दिन साजरा, सप्ताहाचा शुभारंभ, अधिकारी/कर्मचारी संवाद व पुरस्कार वितरण.२ ऑगस्ट: २०११ पूर्वी शासकीय जागेवर वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप.
३ ऑगस्ट पांदण/शिवार रस्त्यांची मोजणी व दुतर्फा वृक्षारोपण.
४ ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत विविध मंडळांमध्ये उपक्रम.५ ऑगस्ट विशेष सहाय्य योजनेंतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन अनुदान वाटप.६ ऑगस्ट शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांची काढणी व शर्तभंग प्रकरणांवर निर्णय.७ ऑगस्ट: M-Sand धोरणाची अंमलबजावणी व सप्ताह सांगता समारंभ.या आठवड्यातील विविध लोकाभिमुख उपक्रमांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, डॉ, रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी केले आहे.
Comments
Post a Comment