*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र 6 खामगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*
*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र 6 खामगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*
खामगाव (संतोष आटोळे) येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ६ खामगांव मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.
सार्थक दिगंबर चाळगे या विद्यार्थ्याने 248 गुण मिळवत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे.रेणुका अनंता बोर्डे हिने 206 गुण मिळवत जिल्हास्तरावरील 44 वा क्रमांक,तर कृष्णा ज्योतिबा वानखडे याने 174 गुण मिळवून जिल्हास्तरावर 130 वा क्रमांक मिळवला आहे.या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पातळी अधोरेखित केली आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि पालकांच्या सततच्या पाठिंब्यालाजाते.शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्रकुमार मापारी,शिक्षकवृंद व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कॉन्व्हेंटच्या या युगातही नगरपरिषद शाळा क्रमांक 6 ने जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीमध्ये आपले तीन विद्यार्थी चमकवून शहरातील आपला दबदबा कायम ठेवला आहे. यामुळे सरकारी शाळेमधून गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत असल्यामुळे पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment