अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील सर्वात मोठे महाआरोग्य जीवनदायी शिबिर-पर्व दुसरे भालेगाव बाजार येथे यशस्वीरित्या संपन्न..! आरोग्य क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 3000 रुग्ण तपासणीचा आकडा झाला पार...!!अस्तित्वच्या कार्याची निसर्गाला सुद्धा जाण.

अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील सर्वात मोठे महाआरोग्य जीवनदायी शिबिर-पर्व दुसरे भालेगाव बाजार येथे यशस्वीरित्या संपन्न..!
 आरोग्य क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 3000 रुग्ण तपासणीचा आकडा झाला पार...!!
अस्तित्वच्या कार्याची निसर्गाला सुद्धा जाण..!!
खामगांव प्रतिनिधी - महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवेचं व्यासपीठ" म्हणुन नावाजलेल्या अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्यदिव्य महाआरोग्य जीवनदायी शिबिर-पर्व दुसरे,भालेगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये राबविण्यात आले. 21 जुलै रोजी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस 22 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुरूच होता. एवढे मोठ्या भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्यानंतर शिबिर पूर्णत्वास जाते की नाही असा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाला होता. परंतु अस्तित्व परिवाराच्या अस्तित्व योध्यांची रुग्णसेवेची जिद्द,चिकाटी आणि तळमळ पाहुन त्यांना निसर्गाने सुद्धा साथ दिली, असें म्हटल्यास वावगे ठरणार नाही.आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी  पाऊस चालू असताना भालेगाव बाजार येथील रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मात्र बरोबर शिबिराच्या नियोजित वेळेस बंद झाला, तो थेट शिबीर पूर्ण होईपर्यंत. शिबीर सायंकाळी 6.20 मिनिटांनी पूर्ण झाले असता, वरूनराजे पुन्हा बरसण्यास सुरू झाले. म्हणूनच अस्तित्वच्या कार्याची दखल घेऊन, ही एक प्रकारची निसर्गाची कृपा सुद्धा अस्तित्व परिवारावर झालेली आहे,असे मान्यवरांसोबत परिसरातील जनता म्हणत आहे. याआधी 2023 च्या आरोग्य शिबिराच्या अभूतपूर्व यशानंतर यावर्षी सुद्धा अस्तित्व परिवाराच्या वतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 3147 रुग्णांची तपासणी करण्यात आली व पुढील उपचारासाठी 410 रुग्णांचा महाराष्ट्रातील नामवंत रुग्णालयामध्ये उपचारासाठी प्रवेश निश्चित करण्यात आला. या भव्यदिव्य अशा आरोग्य शिबिराला प्रामुख्याने गोदावरी फाउंडेशन जळगाव, सुप्रसिद्ध डॉ. दिपक लद्दड सरांची पूर्ण टिम, सामान्य रुग्णालय खामगांव, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा, प्राथमिक आरोग्य केंद्र पि. राजा. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थिती होती.सोबतच डॉ.आश्विनी मुरडकर, डॉ.श्रुती लढढा, डॉ.ओमप्रकाश काकडे, डॉ.सौरभ भानुशाली, डॉ.तन्मय मेहता, डॉ.आदित्य पाटील, डॉ.नीरज जगताप, डॉ.पल्लवी शेंडगे, डॉ.विराज पाटील, डॉ.शुभम सावरकर, डॉ.अभिजित काकड, डॉ.शितल ठक, डॉ.गुलाब पवार, डॉ.अंकिता खांदे, डॉ.जयंत सोनोने, डॉ.सागर देशमुख इत्यादी सह असंख्य डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती. या शिबिरामध्ये मानवी शरीराशी निगडित असलेल्या प्रत्येक आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी अस्तित्व परिवाराने उपलब्ध करून घेतले होते.उत्कृष्ट तथा दिमाखदार नियोजन अस्तित्व परिवाराचे सर्वेसर्वा श्री.आकाश इंगळे व त्यांच्या अस्तित्व परिवाराने केले.एवढ्या मोठ्या शिबिरामध्ये येणाऱ्या रुग्णाची व्यवस्था खरोखर व्याख्यानजोगी होती. सर्व डॉक्टरांच्या चमुला चहा-नाश्ताची व्यवस्था सुद्धा उत्तमरित्या करण्यात आली होती. शिबिराच्या सुरुवातीलाच सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सर्व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. तसेच सदैव गरजु रुग्णांना रक्तदान देऊन जिवनदान देणाऱ्या 51 रक्तदात्यांचा अस्तित्व परिवाराच्या वतीने "अस्तित्व-योद्धा" म्हणुन यथोचित असा सत्कार-सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर तालुक्या भराततुन आलेल्या सर्व रुग्णांची महाराष्ट्र भरातुन आलेल्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली व सर्व रुग्णांना मोफत औषधी सुद्धा वितरण करण्यात आली. वैद्यकीय इतिहासात प्रथमच ग्रामीण भागामध्ये महाआरोग्य जीवनदायी शिबीर राबवताना 2D-Echo मशीन सह इसीजी मशीन सुद्धा उपलब्ध करण्यात आली.

 *विशेष बाब* 
• निसर्गाच्या असिम कृपेच्या सानिध्यात पूर्णत्वास गेले महाआरोग्य शिबिर.. 
• आरोग्य क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये 2D-Echo मशीनची व्यवस्था..
•  जागीच तपासणी, रिपोर्ट आणि औषधी वितरण करणारे पहिले आरोग्य शिबीर..
 • 51 रक्तदात्यांचा "अस्तित्व-योद्धा" म्हणून सत्कार-सन्मान.. 
 • एवढ्या भव्यदिव्य शिबिरामध्ये मोफत औषधी वितरणाची व्यवस्था करणारे ग्रामीण भागातील पाहिलेच शिबीर..
 • एकाच वेळी चार तज्ञ डॉक्टरांच्या चमूची व्यवस्था करणारे पहिलेच शिबीर..
• नियोजनामध्ये नेहमीप्रमाणे अव्वल. चहा, पाणी आणि नाष्ट्याची सुद्धा व्यवस्था..
• 3000 रुग्ण तपासणीचा आकडा पार..
• शालेय मुलांना फळवाटप..

 *मान्यवरांची उपस्थिती*
 अस्तित्वच्या महाआरोग्य शिबिरास माजी आमदार दिलीपकुमार सानंदा,ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे , ओबीसी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष सुरज बेलोकार,सामाजिक रिपब्लिकन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश दांडगे,खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संघपाल जाधव,खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंजाबराव देशमुख यांच्यासह असंख्य मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन अस्तित्व परिवाराच्या कार्याची दखल घेत त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे भरभरून कौतुक केले.अस्तित्वच्या या सेवाभावी कार्यामुळे हजारो रुग्णांना जिवनदान मिळत आहे, यामध्ये तिळमात्र सुद्धा शंका नाही.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.