व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या खामगाव येथे 10वी,12वी च्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार व किट वितरण
व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या खामगाव येथे 10वी,12वी च्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार व किट वितरण
खामगाव
संतोष आटोळे
व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या खामगाव शहर व तालुका शाखेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने खामगांव शहर व ग्रामीण भागातील समस्त पत्रकार बांधवांच्या दहावी, बारावीतील पाल्यांच्या म्हणजेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व सोबतच काही पत्रकार बांधवांच्या विध्यार्थी मुलांना शैक्षणिक किट वाटपाचा कार्यक्रम आज दिनांक 26 जुलै 2025 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक पत्रकार भवन येथे पार पडला.खामगांव शहरात प्रथमच पत्रकार बांधवांच्या गुणवंत पाल्यांचे गोड कौतुक करण्या करिता व त्यांच्या कला गुणांना वाव देण्या करिता ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे पत्रकार क्षेत्रात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.या वेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे खामगांव शहर व ग्रामीण परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यां सह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.*
Comments
Post a Comment