*रविवार सुट्टीच्या दिवशी"हिंदी सक्तीचा निर्णय अखेरीस सरकारने केला रद्द
*रविवार सुट्टीच्या दिवशी
"हिंदी सक्तीचा निर्णय अखेरीस सरकारने केला रद्द!"
मुंबई
देवेंद्र मेश्राम
"हिंदी सक्तीचा निर्णय अखेरीस रद्द
ही केवळ एक बातमी नाही, तर मराठी अस्मितेचा मोठा विजय आहे.
मराठी माणसाने एकजूट दाखवली, आवाज उठवला आणि शेवटी सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला.
ही मराठी जनतेच्या जिवंतपणाची, स्वाभिमानाची आणि जागरूकतेची साक्ष आहे.
भाषा ही ओळख असते, संस्कृती असते, आत्मा असतो – आणि ती जबरदस्तीने बदलता येत नाही
यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या राजकीय पक्षसह मराठी भाषिक सर्व संघटना कलाकार अभ्यासक लेखक
यांनी राज्यामध्ये त्रिभाषिक सूत्र बालपणापासून विद्यार्थ्यांना आत्मसात करण्याकरिता पहिली ते पाचवी हिंदी भाषेचा समावेश असलेली अभ्यास करणे या कोवळ्या मनाच्या मुलांवर बिंबविण्याचा काम या राज्य सरकारने आखले असल्याचे चित्र समोर आले या सर्व त्रिभाषिक पद्धतीच्या अभ्यासक्रमाला मराठी भाषा वाचविण्याकरिता संपूर्ण राज्यभर रान उठविण्याकरिता पाच जुलै रोजी मराठी भाषा वाचवण्याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
यासाठी आज दिनांक 29 जून रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदी भाषा साठी काढलेल्या परिपत्रकाची होळी राज्यभर करण्यात आली
इतर राज्यांमध्ये द्विभाषिक पद्धत असताना राज्यात त्रिभाषित अभ्यासक्रम बाल मनावर आतापासूनच का जबरदस्ती करावी ज्या बाल वयात मुलांना आपली मातृभाषा ही सुद्धा नीट बडबड करता येत नाही असे असतानाही शासनाने त्रिभाषा पद्धत विद्यार्थ्यानवर का लादली जात आहे
यामुळे राज्यभरामध्ये सरकार विषयी मराठी माणसामध्ये रोष निर्माण होण्याची धग पाहता आज रविवार सुट्टीचा अवकाश यामध्ये तातडीने निर्णय घेत त्रिभाषिक अभ्यासक्रमाचा काढलेला आदेश रद्द करण्यात आला
घेतलेल्या या निर्णयामुळे
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात
मराठी माणसाच्या एकतेचा सलाम
या राज्य सरकार ने स्वीकारला आहे
Comments
Post a Comment