*हिरव्या क्रांतीची पाळेमुळे शाळेतच – सहकार विद्या मंदिरात २३०० देशी झाडांचे वाटप*

*हिरव्या क्रांतीची पाळेमुळे शाळेतच – सहकार विद्या मंदिरात २३०० देशी झाडांचे वाटप*
डोंगरख़ंडाळा - 
येथील श्रीमती बसंतीबाई देवकीसनजी चांडक सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे दि.19 जुन 2025 रोजी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजीं यांच्या प्रेरणेतून, डॉ.सुकेश झंवर व सौ.कोमल झंवर यांच्या मार्गदर्शनाने 2300 वृक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 वृक्षवल्ली आम्हा सोयरे | वनचरे || या संत शिरोमणी तुकोबारायांच्या ओविंना सार्थ ठरवीत . राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांची संकल्पना *"वसुंधरा" आम्ही तुझे अपराधी..* यामाध्यमातून
 *2300 देसी वृक्ष* ज्यामध्ये वड, पिंपळ, लिंब , जांभूळ, चिंच , आंबा, सीताफळ व इतर वृक्ष वाटप करण्यात आले. राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी बुलडाणा अर्बनच्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून वृक्ष लागवडीचा पावन विचार सर्वत्र राबवित आहेत.

 वृक्षरोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाचे अनेक सामाजिक उपक्रम बुलडाणा अर्बन परिवाराद्वारे दरवर्षी सातत्याने राबविले जातात. 
वड, पिंपळ, औषधी वनस्पती, फळझाडे, अशा देशी व उपयोगी झाडांच्या रोपांमुळे शाळा परिसरात जणू छोटेखानी वननिर्मितीच झाली. प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देऊन "झाड दत्तक घ्या, ते वाढवा" असा संकल्प देण्यात आला.

सौ.कोमल झंवर  यांची प्रतिक्रिया "आज एक झाड लावले, तर उद्या तीच छाया आपल्या पिढ्यांना संरक्षण देईल. पर्यावरण हा अभ्यासाचा विषय नसून, तो जगण्याची शैली बनवली पाहिजे."
"एक मूल – एक रोप" या विचारातून हिरवळ निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम इको क्लबच्या माध्यमातुन  राबविण्यात आला. 
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेले "हिरवी शपथ" पत्र, ज्यावर त्यांनी स्वाक्षरी करून झाड जगवण्याची जबाबदारी घेतली. यावेळी अनेक पालकही उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

“सहकार विद्या मंदिराने खऱ्या अर्थाने ‘हरित क्रांती’ची मुहूर्तमेढ रोवली आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिली.
या वृक्ष वाटप कार्यक्रमाच्या वेळी याप्रसंगी स्थानिक संचालक श्री. अनंतराव सावळे ,बबनराव उजेड ,बबनलालाजी गाडगे, व  इतर संचालक मंडळ, तसेच  बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक श्री. राजेंद्र वानेरे, शाखा व्यवस्थापक अनिल देशपांडे, बुलढाणा अर्बन टेक्स्टाईल मिलचे  संपत यादव, संतोष शिंदे उपस्थित होते व कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाघमारे, मुख्याध्यापक सतीश रोढे, प्राध्यापक,शाळेचे शिक्षक वृंद, इतर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.