*मलकापूर येथे दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई*
*मलकापूर येथे दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई*
मलकापूर
ग्रा. हद्दीत अवैध देशी दारुचे 26 बॉक्ससह एकास पकडले, स्था.गु.शा.ची कारवाई. चालू माहेमध्ये दारुबंदी-21, जुगार-07-केसेस, 49-आरोपींवर गुन्हा एकूण 8,28,825/-रु.चा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यात अवैध व विनापरवाना देशी-विदेशी दारु, गावठी हा.भ. दारु या व इतर अवैध धंदे करणाऱ्या इसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करुन, जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा.श्री. निलेश तांबे यांनी जिल्ह्यात घेतलेल्या पहिल्याच गुन्हे परिषदेमध्ये आदेशीत केले होते. सदर आदेशाप्रमाणे अपोआ, श्री. श्रेणिक लोढा, श्री. बी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन, लांडे- स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांनी जिल्ह्यात अवैध व विनापरवाना दारु, जुगार संबंधाने कार्यवाहीसाठी विशेष पथके तयार करुन, वरिष्ठांकडून आदेशाप्रमाणे तंतोतंत कार्यवाही करणेबाबत सुचित केले. *हकीकत दि. 15/06/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. मलकापूर ग्रामीण हद्दीत एक ईसम हा त्याच्या ताब्यातील इंडीका व्हिस्टा वाहनामध्ये देशी दारु बाळगून त्याची चोरटी वाहतूक करीत आहे. सदर माहितीच्या आधारे पथकाने ग्राम घिर्णी फाटा येथे सापळा रचून कारवाई केली. सदर कारवाईमध्ये खालील प्रमाणे आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी विरुध्द पो.स्टे. मलकापूर ग्रामीण येथे कलम 65(अ) (इ) म.दा. का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सविस्तर विवरण खालील प्रमाणे. गुन्ह्यांचा पुढील तपास पो.स्टे. मलकापूर ग्रा. करीत आहेत. *आरोपीचे नांव :- 1. मोहन नयनसिंग जाधव वय 37 वर्षे, रा. घिणी ता, मलकापूर (15/06/2025) * आरोपीच्या ताब्यातून हस्तगत मुद्देमाल :- 2. देशी दारुचे शिश्यांनी भरलेले 26 बॉक्स किं. 88,620/-रु., 3. पांढऱ्या रंगाची टाटा व्हिस्टा गाडी किं. अं. 2,00,000/-रु. एकूण 2,88,620/-रु.चा मुद्देमाल. * वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक सदर कामगिरी मा.श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलडाणा, श्री. श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री बी.बी. महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि संजय मातोंडकर, पोलेकों, दिगंबर कपाटे, विजय पैठणे, रघुनाथ जाधव, पोना, विजय वारुळे, पोकॉ. मनोज खरडे, पोकों, हर्षल जाधव, चापोहेका, समाधान टेकाळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी केली. * माहे जून 2025 मध्ये स्था. ग. शा. पथकांनी अवैध धंद्यांवर केलेली धडक कारवाई: मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विवोध पथके नियुक्त करुन, जिल्ह्यातील पाचही विभागांमध्ये खालील प्रमाणे अवैध दारु व जुगारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
Comments
Post a Comment