शिवसेनेच्या वतीने नवनियुक्त ठाणेदार किशोर साहेब तावडे यांचा शुभेच्छा देत सत्कार..
शिवसेनेच्या वतीने नवनियुक्त ठाणेदार किशोर साहेब तावडे यांचा शुभेच्छा देत सत्कार...
खामगाव
(संतोष आटोळे)
खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून रुजू झालेले नवनियुक्त पी. आय.किशोर साहेब तावडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत यांच्या सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
तसेच आपणच इथे आपला दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण करावा ही सुद्धा विनंती केली.
त्याच्या मागील कारण असे आहे की मागील काही महिन्यात आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच मुंबई इथून आलेले ठाणेदार चव्हाण साहेब नुकतीच बदली झाली त्यांच्या आधी आलेले आलेवार साहेब यांची सुद्धा बदली झाली त्यांच्या आधी असलेले ठाणेदार वाघ साहेब यांची सुद्धा आपला कार्यकाळ पूर्ण न करता बदली झाली काही महिन्यातच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला चार ते पाच ठाणेदार लाभले.
त्याच कारणास्तव वरिष्ठ अधिकारी व ठाणेदार साहेबांना विनंती करण्यात आली की आपणच आपला कार्यकाळ पूर्ण करून अवैध धंदे व गुन्हेगारावर खडक शासन करावं अधून मधून बदलीमुळे अवैध धंदे व गुन्हेगारावर वचक राहत नाही करिता आपणच कायमस्वरूपी राहावे अशी विनंती करण्यात आली.
साहेबांनी सुद्धा विनंतीला मान देऊन सांगितले मी अद्याप पर्यंत जिथे गेलो तिथे माझा पूर्ण कार्यकाळ करूनच पुढे गेलो.
यावेळी उपस्थित शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश भाऊ वावगे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, बांधकाम कामगार सेनेचे विदर्भ प्रमुख दीपक भाऊ विटे,बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बोरे,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश भाऊ खरात,महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख,शिव वाहतूक सेना तालुका प्रमुख सिद्धेश्वर भाऊ निर्मळ,उप तालुकाप्रमुख ज्योती ताई पुजाडे,महिला आघाडी उप तालुकाप्रमुख श्वेताताई पाटील,कुणबी युवा मंच अध्यक्ष मनोहर भाऊ आखरे,बांधकाम कामगार सेना जिल्हा संघटक मारुती भाऊ खोडके,कामगार सेना शहर प्रमुख प्रविण भाऊ देशमुख,कामगार सेना तालुका सचिव योगेश भाऊ पुरोहित,युवा सेना उप तालुकाप्रमुख नयन भाऊ टिकार,आशिष भाऊ ठाकरे,शिवसेनेचे नामदेवभाऊ भोंडे,शिवसेना विभाग प्रमुख ओम देशमुख, अनुसूचित जाती शहरप्रमुख मयूर भाई खंडारे,
शिवसेना,महिला आघाडी,बांधकाम कामगार सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Comments
Post a Comment