हजारो दिव्यांगांनी भीक मागत आमदार खासदार निधीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर काढला मोर्चा

हजारो दिव्यांगांनी भीक मागत आमदार खासदार निधीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर काढला मोर्चा 

नांदेड  :(एडवोकेट राहुल गीते) 
दिव्यांगांसाठी असलेला खासदार आमदार निधी खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगाचे पुनर्वसन होत नाही. छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळत नाही. हा निधी खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर भिक मागत, आंदोलन करत. मागण्यांचे निवेदन घेऊन मोर्चा धडकला, या मोर्चामध्ये हजारो दिव्यांगांनी सहभाग घेतला होता, आमदार खासदारांनी दिव्यांग निधी त्वरित खर्च करावा दिव्यांगांना जगण्याचं बळ द्यावं या मागणीसाठी हा मोर्चा खासदार चव्हाण यांच्या घरावर धडकला.
राज्य व केंद्र शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या जातात त्याचबरोबर निधीही दिला जातो खासदारांना व आमदारांना निधी खर्च करण्याचा अधिकार दिला जातो व त्यांच्या खात्यामध्ये निधी दिला जातो परंतु स्थानिक खासदार आमदार हा निधी वर्षानुवर्षं खर्चच करत नसल्यामुळे दिव्यांगांना शासनाच्या योजना मिळत नाहीत. यासाठी वारंवार तक्रार निवेदन देऊनही आंदोलन उपोषण करूनही आमदार खासदारांनी निधी खर्च केला नसल्याने सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खासदार आमदारांच्या घरावर भीक मागो आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिवाजीनगर येथील ओम हॉटेलपासून भिक मागत-मागत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर धडकला. या मोर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील.नागनाथ कामजळगे,रवि कोकरे.शिवाजी सुर्यवंशी.किरणकुमार न्यालापल्ली.लक्ष्मीकांत जाधव.शिवराज बंगरवार, मोहसिन पठाण,राजु शेकुरवार,कार्तिक कुमार भरतीपुरम.शेषेराव वाघमारे,सय्यद आरिफ, सुनिल जाधव.गोविंद बोद्देवाड,दिनेश डुमने.सय्यद आतिक.शेख मुबीन.मसुद मुलाजी.शेख माजीद.अजय गोरे.राजु इराबत्तीन, नागेश निरडी.थोरकर.सिद्धोधन गजभारे.शेख आलीम.राजेश फरकंडे.अनिता लोणे.भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, सविता गवते यांच्यासह हजारो दिव्यांग बांधव भगिनी सहभागी झाले होते.
.......,.
.....
आमदार राजेश पवार हे घरी नसल्याने त्यांच्या घरी कोणीच निवेदन स्वीकारायला नसल्याने दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांच्या गेटला निवेदन चिटकून निदर्शने करण्यात आली.
..........

चौकट.....
भिक मागो आंदोलनामध्ये माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी एक हजार एक रुपया खासदार आमदार यांना भीक म्हणून दिला. तसेच सामान्य नागरिकांकडून खासदार आमदारांना १,रूपया,२ रूपया,५ रूपये ,१० रूपये आणि २० रूपये अशा प्रकारची भीक देण्यात आली.

चौकट 
...................
भोकर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांवर निधी खर्च करणार असून त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने दिव्यांगांचा निधी खर्च करणार आहे.
अद्याप मला प्रशासनाच्या वतीने कोणत्याच प्रकारचे पत्र मिळाले नसून प्रशासनाने आदेशाची प्रत मला दिली नाही. त्यामुळे मी दिव्यांगांच्या निधी खर्चाबाबत प्रशासनाशी चर्चा करून त्वरित दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लावून खासदार आमदारांचा निधी खर्च करणार असल्याचे शिष्टमंडळास माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले नंतर जिल्ह्यातील व राज्यातील दिव्यांगांवर हा निधी खर्च करणार.. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले 

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.