*अतिक्रमणाच्या पावसात**खामगावात आला बेरोजगारीचा महापुर!*
*अतिक्रमणाच्या पावसात*
*खामगावात आला बेरोजगारीचा महापुर!*
खामगाव
संतोष आटोळे
खामगाव नगरपरिषदेने आज आपल्या सर्व शक्तीनिशी पोलीस विभाग महसूल विभाग भूमि अभिलेख विभाग विद्युत विभाग आरोग्य विभागात विभागांसह खामगाव शहरांमध्ये सामूहिक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये आधीच बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या युवकांना बेरोजगारीच्या खाई मध्ये लोटण्यासारखाच प्रकार अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकांच्या तोंडातून निघून आला आहे
आधीच बेरोजगारीचे महासंकट वाढलेली महागाई यावर माफ करीत छोट्या छोट्या
टपऱ्या उभारी त आपल्याला साजेसा व्यवसाय ऊभारत आपल्या आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याकरिता या बेरोजगारांनी व्यवसायाच्या माध्यमातून आपली उपजीविका त्यांनी चालवली होती
आज झालेल्या या अतिक्रमण च्या कार्यवाहीमुळे यांच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसला आहे
नेहरू मार्केट परिसरात झालेल्या कार्यवाही विषयी दर्शनी भागावर लावलेल्या दुकानांच्या प्रसिद्धीसाठी आकर्षक बॅनर ची सजावट कुठल्याच प्रकारच्या अडचणी नसतानाही तोडल्यामुळे या मार्केटमधील व्यवसायिकांनी नगरपालिके विषयी तिखट रोष व्यक्त केला आहे
*तर काहींचा अतिक्रमण हा धंदा*
संपूर्ण खामगाव शहरामध्ये राजकीय व गुंडशाहीचं पाठबळ असलेल्या अतिक्रमण धारकांनी
अनेक ठिकाणी आपल्या टपऱ्या उभारून शंभर रुपये, दोनशे रुपये, तीनशे रुपये रोजाप्रमाणे ठरवून त्या भाड्याने सुद्धा दिल्याचे समोर आले आहे
*गाळे विकण्याकरिता केलेली कार्यवाही!*
नगरपरिषदेने व्यवसायिक असलेल्या ठिकाणी उभारून ती विकायची असल्यामुळे तसेच लाखो रुपये किंमत असलेल्या त्या त्या दुकानांना गिऱ्हाईक उपलब्ध नसल्याचेही लक्षात आल्यामुळे नगरपालिकेने ही कार्यवाही केल्याचे ही समोर आले आहे
*राजकारणी लोकांनी फिरवली पाठ!*
सकाळपासून सुरू झालेल्या अतिक्रमणाच्या या कारवाईमध्ये ज्यांची दुकाने उद्ध्वस्त होत होती त्यांनी आपल्या चीर परिचित असलेल्या राजकिय नेत्यांना संपर्क करीत होत असलेल्या कार्यवाहीसाठी काही मदत करता येईल का, तर काही मोठे नेते फोन बंद करून संपर्काच्या बाहेर असल्याचे यावेळी काही अतिक्रमणधारकांनी सांगितले
*येत्या काळात वाढणार प्रशासनाच्या डोकी समस्या*
लोकांच्या अतिक्रमणाचे वाटोळे लावणाऱ्या नगरपालिके विषयी संपूर्ण शहरात असंतोष ची भावना निर्माण होत असताना यातून शहरात भयावह स्थितीत निर्माण होणारी बेरोजगारी यातूनच अप्रिय घटना घडतील याचं भान ही प्रशासनाने ठेवणे गरजेचे अशी ही आता चर्चिले जात आहे
Comments
Post a Comment