बापाच्या प्रेमाची आणि कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवंताची भक्ती : जयंत हिंगे.पितृ दिनानिमित्त आदर्श पालकांचा सन्मान कार्यक्रम संपन्न
बापाच्या प्रेमाची आणि कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवंताची भक्ती : जयंत हिंगे.
पितृ दिनानिमित्त आदर्श पालकांचा सन्मान कार्यक्रम संपन्न.
संस्कृती धर्मापेक्षा प्रथम कर्तव्य म्हणून मातापित्यांचा सर्वांगाने सन्मान करणे काळाची गरज आहे. मुलांच्या जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत बापाने केलेल्या प्रेमाची आणि कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवंताची भक्ती होय. मातापित्यांची भक्ती केल्यामुळेच पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या भेटीला जातो. असे मत वन्यजीव सोयरे संस्थेचे संस्थापक जयंत हिंगे यांनी व्यक्त केले.
बुलढाणा शहरामध्ये किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल,आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने पितृ दिनाचे अचैत्त्य साधत प्रशासकीय,सामाजिक आणि पारिवारिक जीवनात आदर्श निर्माण करणाऱ्या पालकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन 15 जून ला सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना
माजी मंडळ अधिकारी जयंत हिंगे उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, संजय येंडोले, अतुल सोनुने,सचिन शेलार, भूपेश पाटील,विशाल राणे, दिवाकर राणे, कमलाकर व्यवहारे, पुरुषोत्तम व्यवहारे, सतीश हीवरकर, सुरेखाताई निकाळजे, आशाताई गायकवाड, पंचफुलाबाई गवई,भारती अवचार, ताईबाई जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादनाने सन्मान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सेवा देत पारिवारिक जबाबदारी, कर्तव्य सर्वोत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या बुलढाणा शहरातील मातापित्यांचा स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सुशांत शेळके पाटील यांनी केले. संचालन गणेश राऊत यांनी तर आभार प्रदर्शन मोहन सोळंके यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी आयोजक संघटनांच्या पदाधिकारी प्रतिनिधींनी परिश्रम घेत बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली
Comments
Post a Comment