वर्ल्ड कप साठी कुडो असोसिएशन व क्रीडा विभाग खामगावच्या वतीने खेळाडू फरहानचा सत्कार*
वर्ल्ड कप साठी
कुडो असोसिएशन व क्रीडा विभाग खामगावच्या वतीने खेळाडू फरहानचा
सत्कार*
खामगाव
संतोष आटोळे
दि. २८ जून रोजी वर्ल्ड कप बल्गेरिया, युरोप साठी सिलेक्ट झालेले भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मोहम्मद फरहान मोहम्मद नईम यांचा स्पर्धेसाठी जाण्यापूर्वी भव्य सत्कार समारंभ पत्रकार भवन खामगाव येथे आयोजित करण्यात आला होता
यावेळी समारंभासाठी मा. तहसीलदार श्री सुनील पाटील , मा. श्री लक्ष्मीशंकर यादव सर तालुका क्रीडा अधिकारी, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र रोहनकर तसेच कोच राजेश सोनले सर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती
खेळाडू फरहानला शुभेच्छा देते प्रसंगी तहसीलदार सुनील पाटील यांनी आपल्या जिल्हा सह खामगाव चे नाव अटकेपार रोवावे अशा शुभेच्छा देत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले
तर तालुका क्रीडा अधिकारी यादव सर यांनी क्रीडा विश्वामध्ये आपली व आपल्या परिसराची यशस्वीतेने निर्माण करावी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले
*NBSII ब्लॅक बेल्ट* च्या एक्साम मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे बेल्ट वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी
कुडो स्पर्धेच्या वर्ल्ड कप साठी पात्र ठरलेला फरहान हा खामगाव शहरातील माजी नगरसेवक नईम यांचे पुत्र आहेत
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितांसह अजहर जमादार मोहम्मद आरिफ श विविध मान्यवर
विद्यार्थी वर्ग पालकांची आवर्जून उपस्थित होती
मोहम्मद फरहानला वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये यशस्वीतेसाठी दिव्यांग शक्ती परिवाराच्या वतीने मनस्वी शुभेच्छा
Comments
Post a Comment