आझाद हिंदची पोलीस अधीक्षकांसोबत मॅरेथॉन बैठक संपन्न.मोताळ्यातील सोलर प्लांट संचालकावर गुन्हे दाखल करावे.अनधिकृत सावकारीला लगाम लावा.
आझाद हिंदची पोलीस अधीक्षकांसोबत मॅरेथॉन बैठक संपन्न.
मोताळ्यातील सोलर प्लांट संचालकावर गुन्हे दाखल करावे.
अनधिकृत सावकारीला लगाम लावा.
बुलढाणा : (दिव्यांग शक्ती)
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आझाद हिंद ने जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत प्रथम बैठक घेत ज्वलंत मागण्यांच्या अनुषंगाने निवेदन सादर करीत सलामी दिली. यावेळी आझाद हिंद च्या पदाधिकाऱ्यांसोबत एक तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत जिल्हा व बुलढाणा शहरातील महत्त्वपूर्ण ज्वलंत तक्रारी समस्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली.
बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मुलींचा शोध घेणे, मुलींच्या खरेदी विक्री घटनांना गांभीर्याने घ्यावे कारवाई करावी,अनधिकृत सावकारीला लगाम लावणे,व्यसनाधीनतेचे आवरण घेऊन गुन्हेगारी करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त लावाने.अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, ज्यामुळे अनधिकृत व्यवसाय सुरू होणार नाही. मोताळातील बनावट दस्तऐवज बनविणाऱ्या में ओ. 2 रिन्यूबेवल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालकावर गुन्हे दाखल करावे.आझाद हिंदच्या कार्यकर्त्यावरील बनावट गुन्ह्यांची चौकशी करून कारवाई करावी. यासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चर्चा संपन्न झाली.सदर बैठकीनंतर पोलीस अधीक्षकांचे स्वागत करीत निवेदनही सादर करण्यात आले.
____
आझाद हिंद सह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील, जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, जिल्हा सचिव शेख अफसर, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील, विदर्भ उपाध्यक्ष भूपेश पाटील, ग्राम स्वराज्य समितीचे संयोजक कमलाकर व्यवहारे, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे,आझाद हिंद महिला संघटनेच्या पंचफुलाबाई गवई, मातृतीर्थ रणरागिणी संघटनेच्या आशाताई गायकवाड,ऍड प्रतीक देखणे,समीर पठाण, शाहरुख खान आदींची प्रमुख उपस्थिती होते
Comments
Post a Comment