भाजपा दिव्यांग आघाडीचा जन संवाद कार्यक्रम संपन्न
भाजपा दिव्यांग आघाडीचा जन संवाद कार्यक्रमाचे आयोजन संपन्न
नागपूर
(दिव्यांग शक्ती)
दिनांक 22-6-2025 रोजी लवकुश नगर मानेवाडा येथील वाळके सेलिब्रेशन येथे दिव्यांगजन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. सुधाकर जी कोहळे साहेब माजी आमदार दक्षिण नागपूर व मा. श्री. अजय बोधरे साहेब, सरचिटणीस भाजपा ग्रामीण नागपूर प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन या पूर्वी मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. दयाशंकरजी तिवारी भाजपा नागपूर शहर अध्यक्ष, माजी भाजपा ग्रामीण अध्यक्ष श्री सुधाकर जी कोहले, भाजपा नागपूर ग्रामीण अध्यक्ष श्री मनोहर जी कुंभारे काटोल व भाजपा नागपूर ग्रामीण अध्यक्ष श्री अनंतराव राऊत उमरेड.
श्री. यांच्या नेतृत्वाखाली दर रविवारी हा कार्यक्रम घेतला आहे घेतला जातो. अमोल देवाजी वाळके, विदर्भ प्रभारी, भाजपा दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र राज्य., मा. श्री सुधाकर कोहळे साहेब आमच्या कार्यक्रमात आले आणि त्यांनी आमच्या दिव्यांग लोकांना प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने देण्याबद्दल बोलले.
आज आमच्या कार्यक्रमात १०६ हून अधिक दिव्यांग लोकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या, ज्यामध्ये उमरेड, सावनेर, मोहपा, वाडी, कामठी, भिवपूर, कामठी, कुही, अमरावती नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून असंख्य दिव्यांग आले होते.
या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीने सुलभ कर्ण योजना, यूडीआयडी कार्ड, रेल्वे पास, स्वयंरोजगार, ई-रिक्षा, बॅटरीवर चालणारी सायकल, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, स्वयंरोजगारासाठी सरकारकडून दिव्यांग बंधू-भगिनींना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजू राऊत जी, प्रमोद राऊत जी, सूर्यकांत वारजुरकर जी, मोहन दिकोंडवार आणि श्री धनंजय उपासनी, श्री मनोज धोटे, हिरालाल जी गुप्ता यांनी केले, या कार्यक्रमासाठी त्यांचे नेहमीच सहकार्य आहे. आणि मोठ्या संख्येने दिव्यांग मित्रांनी मार्गदर्शन केले आणि बरेच दिव्यांग मित्र उपस्थित होते,
दिव्यांगजनांना मार्गदर्शन करण्यासाठी
सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की सर्व दिव्यांग बांधवांनी या कराराचा लाभ घ्यावा असे .
अमोल वाळके विदर्भ रूपाली भाजपा दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे
,
Comments
Post a Comment