अमानवीय पध्दतीने अतीक्रमण काढुन महायुती सरकारची बदनामी करणारे भ्रष्ट मुख्याधिकारी प्रशांत शेळके व त्यांच्या आकाचा पर्दाफाश करणार...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा

अमानवीय पध्दतीने अतीक्रमण काढुन महायुती सरकारची बदनामी करणारे भ्रष्ट मुख्याधिकारी प्रशांत शेळके व त्यांच्या आकाचा पर्दाफाश करणार...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
1 जुलै रोजी अतिक्रमण धारकांना न्याय मिळवुन देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची घेणार भेट
खामगाव ः- खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी हिटलरशाही पध्दतीने अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवितांना अनेक गोरगरीब अतिक्रमण धारकांना नोटीस न देता त्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे चकनाचूर करुन शहरातील जनतेचे कोटयावधी रुपयांचे नुकसान केले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या अमानवीय कृतीमुळे तळहातावर पोट भरणाऱ्या हजारो अतिक्रमण धारकांसमोर रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.एकीकडे मुख्याधिकारी हे लोकांना कायद्याचे ज्ञान देतात तर दुसरीकडे स्वतः कायद्याचे उल्लंघन करुन रुग्णालयासाठी  राखीव असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या स्वतःकरीता कोटयावधी रुपयांचे निवासस्थान बांधुन कायदा पायदळी तुडवीत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या मनमानी आणि हिटलरशाही विरोधात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व संबंधीतांना तक्रार केली आहे. 1 जुलै रोजी मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेवुन अमानवीय पध्दतीने अतीक्रमण काढून
महायुती सरकारची बदनामी करणारे भ्रष्ट मुख्याधिकारी व त्यांच्या आकाचा पर्दाफाश करुन अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देवुन अशी ग्वाही माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली.
खामगाव नगर पालीकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पालीकेच्या वतीने दि.27 व 28 जुन 2025 रोजी खामगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी 28 जून रोजी पत्रकार बांधवांना सोबत घेवुन श्री चंदनशेष चौक मधील अतिक्रमण धारक व नेहरु कॉम्प्लेक्समधील व्यावसायीकांची भेट घेतली व अतिक्रमण निर्मुलन मोहिमे दरम्यान  झालेल्या नुकसानीबाबत व्यावसायीकांची
भेट घेतली व अतिक्रमण निर्मुलन मोहिमे दरम्यान  झालेल्या नुकसानीबाबत व्यावसायीकांची आस्थेने विचारपुस करुन माहिती जाणून घेत तुम्हाला निश्चीतपणे न्याय मिळवुन देईल असा धीर दिला.यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, मनोज वानखडे, पोशाख ड्रेसेसचे संचालक संजुभाऊ शर्मा, माजी नगरसेवक ओमभाऊ शर्मा, सुनिलसिंह ठाकुर,बाजार समितीचे संचालक मंगेश इंगळे, प्रताप कदम,वैभव वानखडे,अतुल संत,तुषार चंदेल,केशव कापले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अतिक्रमण मोहिम राबवितांना भेदभावपुर्ण कारवाई करण्यात आली. काहींना अल्पावधीचीही संधी न देता जेसीबीने त्यांची दुकाने तोडण्यात आली. यामुळे त्यांच्या लाखो रुपये किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले असुन आपल्यावर उपासमारीची वेळ आली आहे असा टाहो अनेक जणांनी फोडला.नेहरु कॉम्प्लेक्समध्ये रहदारीला अडथळा नसतांना व अतिक्रमणाच्या व्याख्येत न बसणारे टिनशेड व हजारो रुपये किंमतीच्या दुकानाचे आकर्षक फलक सुध्दा मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी मनमानी पध्दतीने काढुन टाकले तर  काही  दुकानाच्या पायऱ्या सुध्दा तोडुन टाकल्या. मोहिमे दरम्यान या कॉम्प्लेक्समधील काही दुकानांचे बांधकाम सुध्दा पाडले गेले


असल्याची तक्रार व्यावसायीकांनी केली.या कार्यवाही दरम्यान काहींना अभय देण्यात आले. त्यांना अतिक्रमण हटविण्याची संधी सुध्दा देण्यात आली असल्याची तक्रार नागरीकांनी सानंदांकडे केली.यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी अतिक्रमणधारक  व्यावसायीक व दुकानदारांसोबत चर्चा करुन झालेल्या नुकसानीची माहिती जाणुन घेतली. या अतिक्रमण  निर्मुलन मोहिमे दरम्यान ज्या-ज्या नागरीकांचे अतिक्रमण नाहीत परंतू कारवाई दरम्यान त्यांच्या मालमत्तेचे व दुकानांचे सुध्दा नुकसान झाले आहे अश्या नागरीकांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्व माहितीसह मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन द्यावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी अतिक्रमण धारक नागरीकांना सोबत घेवुन उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांची भेट घेतली व अतिक्रमण धारकांवर झालेल्या अन्यायाबाबत  सविस्तर माहिती दिली. अतिक्रमण नसतांना सुध्दा काही जणांचे दुकाने तोडण्यात आले,मुख्याधिकारी यांनी केलेली अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई ही जुल्मी व अमानवीय आहे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणी संदर्भात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांना निवेदन सुध्दा दिले. भेटी दरम्यान खामगाव नगर परिषदेमध्ये खुल्याआमपणे होत असलेल्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराची माहिती सुध्दा सानंदा यांनी

उपविभागीय अधिकारी यांना दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे महायुती सरकारची बदनामी होत आहे. म्हणून भ्रष्ट प्रवृत्तीचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास जनहितार्थ जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.  
अतिक्रमण मोहिम राबवितांना कारवाई दरम्यान नगर परिषद प्रशासनाने रोडलगत असलेले शहरातील तीन झुणका भाकर केंद्र जेसीबीच्या साहयाने तोडले आहे. यामध्ये बसस्थानक समोरील झुणका भाकर केंद्र, रेल्वे स्टेशन मालधक्का जवळील मराठा चहा लगतचे व टॉवर चौकातील झुणका भाकर केंद्र तोडण्यात आले आहे. परंतू रेल्वे गेट जवळील राजकीय आश्रय असलेल्या एका इसमाचे झुणका भाकर केंद्र तोडण्यात आले नाही, त्याचप्रमाणे मस्तान चौक भागात सुध्दा अतीक्रमण मोहिम राबवितवांना नगरसेविका पतीने नालीवर पक्क्या स्वरुपाचे बांधकाम करुन टिनशेड टाकुन केलेले अतीक्रमण सुध्दा काढण्यात आले नाही.  हाच प्रकार टिळक मैदान परिसरात सुध्दा केला गेला आहे.एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याने जर ही अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई केली असती तर सर्वांना त्याचा अभिमान वाटला असता. मात्र भ्रष्टाचाराने अनेक आरोप असलेले वादग्रस्त मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्या सारख्या अधिकाऱ्याने अतिक्रमण काढण्यासाठी मोहिम राबविली याबदद्ल नागरीकांच्या मनात शंका-कुशंका येत आहे. मुख्याधिकारी यांना आकाचा फोन आल्यानंतर त्यांनी अतीक्रमणाची कारवाई केली आणि आकाच्या फोन आल्यानंतरच कारवाई थांबवली. मुख्याधिऱ्यांचा खरा आका कोण आहे ? हे खामगावकर जनतेला सर्वश्रृत आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.