*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन* व रक्तदान शिबिर
*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन*
व रक्तदान शिबिर
खामगाव दि.:- 22 (उमाका) खामगांव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन सोमवार दिनांक : 23 जून रोजी मा. आकाश भाऊ फुंडकर, कामगार मंत्री महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह तहसिल कार्यालय खामगांव येथे सकाळी 10.30. आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि जनताकेंद्रित बनवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात शिबीर आयोजित करण्यात येत आहेत.यामध्ये शेतकरी, विद्यार्थी, महिला व सामान्य नागरिकांसाठी महसूल व इतर संबंधित समस्या सोडवणे जसे की जमीन, ओळखपत्रे, रेशन, पीएम-किसान योजनेचे लाभ .ग्रामिण विभागांना वेळीच सेवा मिळवून देणे कागदपत्रांचे वाटप, फेरफार नोंदी, सात-बारा वाटप इत्यादि.महसूल प्रशासनात गतिमानता आणून कामकाजाची कार्यक्षमता वाढवणे.
यासह इतरही शासकीय योजनांचे लाभाचे वितरण करण्यात येणार आहे. सदर शिबीरामध्ये मा. मंत्री महोदयांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण व शासनाच्या विविध योजनांबाबत ची माहिती नागरीकांना देण्यात येणार आहे.
यासोबतच *महा रक्तदान शिबिर*
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत तहसिल कार्यालय, खामगाव येथे दिनांक 23 जुन 2025 रोजी
वेळ: सकाळी 10:00 वा.
तहसिल कार्यालय खामगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
*रक्तदानाचे फायदे:-*
कोणालातरी जीवनदान मिळते,
शरीरात नवीन रक्त तयार होते,
हृदय व यकृताच्या आरोग्यास फायदेशीर,
मोफत आरोग्य तपासणी होते.,
नैतिक समाधान व समाजसेवेची भावना वाढते,
आपल्या थोड्याशा कृतीने कुणाचा तरी संपूर्ण संसार वाचू शकतो.
एकटे चला, पण नक्की चला!
सर्व नागरिक, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की, कृपया या रक्तदान शिबिरात Google Form भरून सक्रिय सहभाग नोंदवावा. असे खामगाव तहसिलदार सुनिल पाटील यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment