एम.आय.डी.सी. खामगांव येथील अनेक इंडस्ट्रीज उभारणीमध्ये खामगांव अर्बन बँकेचे मोलाचे योगदान- नामदार अॅड. आकाशदादा फुंडकर

एम.आय.डी.सी. खामगांव येथील अनेक इंडस्ट्रीज उभारणीमध्ये खामगांव अर्बन बँकेचे मोलाचे योगदान
- नामदार अॅड. आकाशदादा फुंडकर
खामगांव 
संतोष आटोळे 
येथील एम.आय.डी.सी. परिसरात बहुतांश उद्योगांना वित्त पुरवठा करणाऱ्या विदर्भ, अराठवाडा, खान्देशासह मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे शाखाविस्तार असलेल्या दि खामगांव अर्बन को-ऑप. बैंक या मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या उद्योग शाखेच्या वास्तूचे सुसज्जीत फर्निचरसह स्वमालकीच्या जागेत ३९ वर्षानंतर नुतनीकरण करण्यात आले. दि. २८ जून २०२५ रोजी सदर नुतनीकरण सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार अॅड. श्री. आकाशदादा फुंडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

मा. ना. अॅड. आकाशदादा फुंडकर यांनी उद्योग शाखेच्या नुतनीकरणाच्या सोहळ्‌याचे प्रसंगी नार्गदर्शन करतांना सांगीतले की, खामगांव अर्बन बँक शहराचे वैभव आहे तर उद्योग शाखा खामगांव अर्बन बँकेचे वैभव आहे. एम.आय.डी.सी. येथील बहुतांश इंडस्ट्रीजला खामगांव अर्बन बँकेने अर्थ सहाय्य केले असून संघ विचार घेवून बैंक प्रगतीच्या पथावर पुढे जात आहे. खामगांव व परिसरातील सर्व क्षेत्रात बँकेचे कार्य असून त्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. प्रा. विजयजी पुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नविन संचालक मंडळ बँकेचा शाखाविस्तार करीत आहेत, भविष्यातही विश्वासाच नातं अधिक दृढ करण्याचे आवाहन उपस्थित उद्योजक, सभासद, ग्राहक खातेदार यांना केले.

सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून प्रसिध्द उद्योजक, बैंकेचे माजी अध्यक्ष तथा वनवासी सेवा समिती, जळगांव जामोदचे प्रकल्प प्रमुख श्री. कन्हैयालालजी पारीक उपाख्य बाबुजी हे होते. याप्रसंगी बोलतांना पारीकजींनी बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री स्व. भाऊसाहेबांसोबत बँकेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, बँकेच्या उद्योग शाखेमुळे एम.आय.डी.सी. मधील उद्योग-व्यवसायांची भरभराट झाल्याचे सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रा. श्री. विजयजी पुंडे हे होते. तसेच मंचावर उद्योग शाखेच्या पालक संचालिका सौ. मनिषाताई माटे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ज्ञानेश्वरजी जाधव हे विराजमान होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित सभासद, खातेदार व उद्योजक यांचेवतीने मनोगत व्यक्त करतांना प्रसिध्द उद्योजक श्री. अरुणजी गुप्ता यांनी शाखेच्च्या वर्धापन दिनाच्या व नुतनीकरण सोहळ्‌याच्या शुभेच्छा दिल्यात तसेच खामगांव एम.आय.डी.सी.व खामगांव अर्बन बैंक एकमेकांस पुरक समीकरण असल्याचे सांगीतले.

बैंकेचे अध्यक्ष प्रा. विजयजी पुंडे यांनी अध्यक्षीय भाषणात सभासद, ग्राहक खातेदार, उद्योजक व हितचिंतक यांच्यामुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. बँकेने सामाजीक बांधिलकी जोपासत मागील आर्थिक वर्षात तीन नविन शाखा विस्तार केला असून अजून नविन शाखा विस्तार तसेच शाखांचे नुतनीकरण करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे सांगीतले.

या कार्यक्रमास बँकेच्या संचालिका सौ. विजयाताई राठी, सौ. फुलवंतीताई कोरडे, सौ. सुवर्णाताई चोथवे, संचालक श्री. अमोलजी हाडे, व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री. घनश्यामदासजी छांगाणी, श्री. मोहनराव हसबनिस. एम.आय.डी.सी. असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मोहनलालजी टावरी, कर्मचारी संघटनेचे सचिव श्री. प्रमोदजी कस्तुरे, तसेच सभासद, ग्राहक, उद्योजक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. राजु जुनारे यांनी केले तर सुत्रसंचलन श्री. किरण रेठेकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शाखेचे शाखाधिकारी श्री. मोहन देशपांडे व सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.


Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.