काँग्रेसचे संघटन मजबूत करून पक्षाचे विचार घराघरात पोहचवा - राहुल बोंद्रे
काँग्रेसचे संघटन मजबूत करून पक्षाचे विचार घराघरात पोहचवा - राहुल बोंद्रे
खामगाव
शेखर तायडे
येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 'जनसेवा' कार्यालयाचे उद्घाटन
खामगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला फार मोठा इतिहास लाभला आहे. देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता रूजवण्याचे काम काँग्रेसने केले असून आजही जनतेच्या मनात काँग्रेस प्रती आदराची भावना आहे. सर्व समाज घटकाला सोबत घेत काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असून आगामी काळ हा काँग्रेसचाच आहे. त्यासाठी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून पक्षाचे विचार घराघरात पोहचवा असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
खामगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 'जनसेवा' कार्यालयाचे उद्घाटन २५ जून रोजी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खामगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक ज्ञानेश्वर दादा पाटील होते. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते फित कापून व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनसेवा कार्यालयाचे थाटात उद्घाटन झाले. यानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत इच्छुक उमेदवार व सध्याचे राजकीय परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांनी जोशाने कामाला लागावे अशा सूचना केल्या.
यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजाराम काळणे, पंचायत समिती माजी सभापती डॉ. सदानंद धनोकार, शेख जूलकर शेख चांद, प्रदेश सरचिटणीस धनंजय देशमुख, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. तबसुम हुसेन, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सीमाताई ठाकरे, सौ. स्मिताताई भोसले, वसीम भाई, ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, शेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर शेजोळे, शहर कार्याध्यक्ष किशोरआपा भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन वाकुडकर, प्रल्हादराव सातव, माजी पंचायत समिति सदस्य सर्वश्री चेतन पाटील, संजय तायडे, मनीष ठाकरे, इनायत भाई, सज्जादउल्ला खान, विठ्ठल सोनटक्के, खविस संचालक पांडुरंग राखोंडे, जिल्हा संघटन सचिव अतुल सिरसाट, किसान काँग्रेस विदर्भ अध्यक्ष मंगेश भारसाकळे, अल्पसंख्यांक विभाग खामगाव शहराध्यक्ष बबलू पठाण, प्रमोद चिंचोळकार, शफीउल्ला खान, मधुकर चोपडे, शिवदास शेळके, संताराम तायडे, भगवान बोंबटकार, प्रकाश इंगळे, प्रविण चोपडे , अनंत गावंडे , अँड. अशोक इंगळे, सुरज बेलोकार, अशोकराव हिंगणे, कैलास बापू देशमुख, जयंतराव खेडकर, कृष्णराव वनारे, लक्ष्मणराव मिरगे, गजानन गव्हाळे, संतोष वराडे, जलील भाई, मुख्तार भाई, अमित तायडे, अँड. शहजाद खान, सौरभ रोछारिया, साहिल देशमुख, कैलास साबे, अक्षय शंकरवार, अंकुश टिकार, वीरेंद्र सिंग इंगळे, कुलदीप राजपूत, प्रल्हादराव गायगोळ, सुबोध गिऱ्हे, सुधाकर डुकरे, शेख समीर, शेखर साबीर, सय्यद जूबेर, शेख सोहेल, सय्यद निहाल, पुरुषोत्तम घोडके, अलीम भाई, वकारखान, साकिद खान, अनिल पाटील, संदीप राठोड, शोयब शेख, अनिकेत पाटील, गणेश पाटील, संदीप शेळके, शेख सलीम, सदानंद वाघमारे, राजेश पाटील, गणेश वानखडे, माणिकराव डिक्कर, अनंत घोंगे, सचिन जयस्वाल, जितेंद्र देशमुख, डिगांबर थेरोकार , विश्वनाथ तिजारे, जावेद देशमुख, संतोष चव्हाण, निवृत्ती राऊत, नकुल देशमुख, अजय भारसाकळे, शेख कयूम यांचेसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय तायडे, प्रास्ताविक तेजेंद्रसिंह चौहान व आभार ज्ञानेश्वर शेजोळे यांनी मानले.
Comments
Post a Comment