आमदार सुनील प्रभू यांना लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव

*आमदार सुनिल प्रभू यांना "लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव राज्यस्तरीय पुरस्कार..!"*
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून  त्यांच्या यशस्वी वाटचालीचा सन्मान..!*

 *मुंबई* - 
देवेंद्र मेश्राम 

सामाजिक संवेदनशिलता आणि मानवतावादी सामाजिक भावनांनी जनहृदयात स्थान मिळवित जनसेवेतून  राजकीय आणि सामाजिक यशाला पात्र ठरलेले दिंडोशी मतदार संघाचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार व मुंबईचे माजी महापौर   आमदार सुनिल प्रभू यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून " लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव" या  राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मार्च महिन्यात मुंबईतील आयोजित एका कार्यक्रमामध्ये आमदार प्रभू अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नव्हते.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सामाजिक सेवाव्रती आणि अधिकाऱ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत असते.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून नव्या मुंबईतील सदिच्छा भेटीत संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व राष्ट्रीय पदाधिकारी तथा शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य,कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांचे हस्ते त्यांना सन्मान स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या सत्कारामध्ये लोकस्वातंत्र्यचे मंत्रालयीन समन्वयक,तथा महाराष्ट्र संघटन प्रमुख रफिक मुलाणी,विनोद चाळके,सुहास मोरे,अॕड.साने हे सुध्दा  सहभागी होते.
      वास्तव समस्यांचा अभ्यास करून त्या  विधानसभेच्या पटलावर ठेवत त्या सोडविण्याच्या प्रयत्न करणारे एक संवेदनशील अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुनिलभाऊ प्रभू यांचा सिध्द परिचय आहे. त्यांच्या या सामाजिक वाटचालीचे मुल्यमापन म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे उपक्रम आणि संघटन कार्याची माहिती त्यांनी घेतली.

     आमदार प्रभू यांनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, प्रभाग व स्थायी समिती अध्यक्ष,सभागृह नेते आणि नंतर महापौरपद भूषवून नागरी समस्यांना सोडविण्याचे व्यापक कार्य केलेले आहे. त्यांच्या दिंडोशी मतदारसंघातील जनभावनांची दखल घेणारे  एक अभ्यासू आणि  कर्तव्यदक्ष जनसेवक म्हणून आपला परिचय त्यांनी  सिध्द केलेला आहे. जनता अदालतींच्या आयोजनातून वृध्द,गरोदर माता, वंचित, निराश्रितांच्या समस्यांना सोडविण्याचे प्रयत्न केल्याने त्यांचा हा समस्या समजून घेणारा सातत्यपूर्ण उपक्रम प्रभावी ठरलेला आहे.
    तीन वेळा आमदार आणि महापौरपद भुषवून यशस्वी राजकीय वाटचालीतून जनविश्वासाला पात्र ठरलेले लोकप्रतिनिधी ही सन्मानजनक बहूमान त्यांना प्राप्त झालेला आहे.या सबंध सामाजिक राजकीय वाटचालीच्या वास्तव आलेखामुळेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून गेल्या मार्च महिन्यातच त्यांना सन्मानित करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.तो समाजरत्न गौरव  पुरस्कार त्यांना काल प्रदान करण्यात आला. 
     ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य  मध्यमवर्गियांचे प्रश्न सोडवून आमदार प्रभूंनी ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनिय ठरलेले आहे. त्यामुळे उदात्त विचारांचे संवेदनशील सेवाभावी आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघातील  नावलौकिकास पात्र ठरलेले आहेत.
    मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला   कार्यप्रवण राहून सार्थ ठरवित त्यांची  सुरू असलेली वाटचाल राहिल्याने जनभावनांचा मौलिक ठेवा प्राप्त करणारे महाराष्ट्रातील एक यशस्वी आमदार म्हणून  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छांसह  लोकस्वातंत्र्य समाजरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.