छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात विविध विभागांचे ४३४ लाभांचे वितरण, कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शन
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात विविध विभागांचे ४३४ लाभांचे वितरण, कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शन
खामगाव
संतोष आटोळे
: . २३ जून
२०२५ रोजी तहसील कार्यालय, खामगाव येथे स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराद्वारे एकाच छताखाली नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ प्रभावीपणे वितरित करण्यात आले. यावेळी कामगार मंत्री ना आकाश फुंडकर यांनी मार्गदर्शन केले. एकूण ४३४ लाभार्थ्यांना लाभ वितरण झाले असून, यामध्ये महसूल विभागाचे २४०, कृषी विभागाचे १७२, ग्रामविकास विभागाचे ४, महिला व बाल विकास विभागाचे ४, आरोग्य विभागाचे १०, वन विभागाचा १ आणि जिगाव सिंचन प्रकल्पाचे ३ लाभसमाविष्ट होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अॅड. आकाश फुंडकर, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी भूषविले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले
की, "प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही करून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करणे हाच राज्य शासनाचा मानस आहे. शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षतेने काम करावे. "व्यासपीठावर मार्गदर्शक उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, अधीक्षक अभियंता जिगाव प्रकल्प श्री श्रीराम हजारे, तहसीलदार श्री सुनील पाटील, कार्यकारी अभियंते श्री परमजीत सिंग जुनेजा, श्री तुषार मेतकर व श्री प्रवीण चावरे, उपविभागीय कृषी
अधिकारी श्री बाळासाहेब व्यवहारे, नायब तहसीलदार श्री विजय पाटील, श्रीमती सोनाली भाजीभाकरे, श्री अभिजीत जोशी व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नायब तहसीलदार श्री निखिल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी श्री देशमुख यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना साकारत, जनतेपर्यंत थेट सेवा पोहोचविण्याचे उत्कृष्ट उदाहरण खामगाव तहसील प्रशासनाने पार पाडले
Comments
Post a Comment