*वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना दीक्षांत समारंभात साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लिट्रेचर (डी-लीट)पदवी प्रदान

*वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना दीक्षांत समारंभात साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लिट्रेचर (डी-लीट)पदवी प्रदान*
*खामगाव* - 
संतोष आटोळे 
*बुलढाणा जिल्हा खामगाव येथील जेष्ठ समाजसेविका तथा प्रतिभावंत साहित्यिक, शिक्षण, मूल्यशिक्षण आणि सामाजिक सुधारणा साहित्याच्या गाढ्या अभ्यासक, "आदर्श शिक्षक पुरस्कार" प्राप्त शिक्षिका, प्रबोधनकार वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टर इन लिट्रेचर (डी-लीट) मानद आचार्य पदवी दि.२१ जून २०२५ रोजी "इगमोर हाॅटेल रामदा चेन्नई" येथील सभागृहात भव्य दिव्य अशा दीक्षांत पदवीप्रदान समारंभात प्रदान करण्यात आली*
           *यावेळी अध्यक्षस्थानी श्री. आर. सेलवम अध्यक्ष ग्लोबल अचिव्हर्स कौन्सिल यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. जे.हरिदास.अधिवक्ता उच्च न्यायालय हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.कुलगुरू डॉ .श्री.ए.एम.मूर्ती*
 *तमिळनाडू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विद्यापीठ चेन्नई,*
*श्री.व्ही.शेखर.भारतीय चित्रपट दिग्दर्शक,लोकप्रिय निर्माता,श्री. सेंथिल.भारतीय चित्रपट दिग्दर्शक-निर्माता  व विनोदी कलाकार,श्री. अँड्र्यू टेलर.सल्लागार-सावू गॅक,श्री. बालशेखरन.भारतीय चित्रपट दिग्दर्शक,डॉ.मिलिंद दहिवले.भारत सरकार सदस्य-दिल्ली अल्पसंख्याक आयोग,या मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.*
          *शिक्षण आणि मूल्यशिक्षण या विषयांमध्ये पारंगत असलेल्या ऊर्मिलाताई ठाकरे यांनी डी.एड,बी.ए,*
*बी.एड, तसेच चार विषयात एम.ए,व  शिक्षण शास्त्रात एम एड, झालेले असून सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे येथे त्या पी.एच.डी पूर्ण होत आहे. त्यांचा शिक्षणक्षेत्रातील शिक्षक,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,* *शिक्षण विस्तार अधिकारी* *असा चाळीस वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे.त्यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य उत्कृष्ट, उल्लेखनीय व अभिनंदनीय आहे. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने दि.०५ सप्टेंबर २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय:ना.मा.*
*विलासरावजी देशमुख यांनी "राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार-सन २००७" देवून त्यांना सन्मानित केले आहे.*
       *ऊर्मिला ताईंचे १०(दहा ) पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. तसेच त्यांनी स्तंभलेखिका म्हणून  "दैनिक देशोन्नती" या वृत्तपत्रात सन २००१ ते २०१० तब्बल दहा वर्ष सातत्याने दररोज A/4 पेज "दैनंदिन शालेय परिपाठ" (मूल्यशिक्षण तासिका) या नावाने स्तंभलेखन केलेले आहे.*
           *त्यांनी विद्रोही साहित्य,पटकथा,गझल,कविता,स्तंभलेखन,कथालेखन आदि.... साहित्याच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा, परिवर्तन व्हावे यासाठी साहित्य लेखन केलेले आहे.सोबतच कलाक्षेत्रात सुद्धा त्या मागे नाहीत त्यांनी रंग मंचावर कलाकार म्हणून"साहसी विजय","छोटा जादुगार" या बाल चित्रपटात व "सन्डे को शुट है" या टेली फिल्म मध्ये  सुद्धा अभिनय केला आहे.* 
             *त्यांना डॉक्टर इन लिट्रेचर (डी.लीट) मानद आचार्य पदवी शिक्षण, मूल्यशिक्षण आणि सामाजिक सुधारणा साहित्य या विषयांसाठी प्रदान करण्यात आली आहे.*
             *दीक्षांत पदवीप्रदान समारंभाचे प्रास्तविक श्री.आर.सेलवम् यांनी केले तर संचलन श्रीमती आयुषा यांनी केले व आभार प्रदर्शन कन्नैय्या जैस्वाल केले.*
          *भव्य दिव्य अशा पदवीदान प्रदान दीक्षांत समारंभाची सांगता मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.*

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.